Last Updated:
युवक क्रांती दलाचे (युक्रांद) संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८५ व्या वर्षी सप्तर्षी यांची प्राणज्योत मालवली.
पुणे : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि युवक क्रांती दलाचे (युक्रांद) संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८५ व्या वर्षी सप्तर्षी यांची प्राणज्योत मालवली. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते आणि लेखक अशी कुमार सप्तर्षी यांची ओळख होती. १९६०-७० च्या दशकात सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत त्यांनी मोलाचे योगदान दिले. दलित-बहुजनांच्या हक्कांसाठी तसेच युवकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी पुण्यात ‘युवक क्रांती दल’ या संघटनेची स्थापना केली.
कुमार सप्तर्षी यांनी पुरोगामी विचार, सामाजिक समता आणि मानवी हक्कांसाठी आयुष्यभर लढा दिला. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यानंतर सामाजिक कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. दलित बहुजनांच्या मंदिर प्रवेशासाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली. विविध आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी त्या त्या वेळच्या सरकारांना घाम फोडला. अनेकदा त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. एकूण ३५ वेळा त्यांना तुरुंगात जावे लागले.
Pune,Maharashtra
