Shraddha Kapoor Eetha Movie Controversy: श्रद्धा कपूरचा ‘ईठा’ अडचणींत; नावावरुन मोठा वाद, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शीर्षक त्वरित बदलण्याचा इशारा


Shraddha Kapoor Eetha Movie Controversy: बॉलिवूडची (Bollywood News) चुलबुली अभिनेत्री म्हणजे, श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या तिच्या ‘ईठा’ (Itha) या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाच्या टीझरची झलक साऱ्यांनाच आवडली. टीझर पाहिल्यानंतर आता प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे. श्रद्धा कपूरच्या अभिनयाचं तर आतापासूनच कौतुक सुरू झालंय. तिच्या नव्या अंदाजाची सर्वांना भूरळ पडलीय. पण, चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या श्रद्धा कपूरचा हा बहुप्रतिक्षित सिनेमा आता वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. सिनेमाचा फक्त टीझरच समोर आलाय आणि आता थेट सिनेमाचं नाव बदलण्याचीच मागणी जोर धरू लागली आहे. 

‘ईठा’ (Eetha) सिनेमा ‘तमाशासम्राज्ञी’ (Tamashasamradnyi) विठाबाई नारायणगावकर (Vithabai Narayangaonkar) यांच्या जीवनावर आधारित आहे. महाराष्ट्रातील लावणी या प्रसिद्ध नृत्यप्रकाराच्या विश्वातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि ‘लावणी सम्राज्ञी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठाबाई या एक दिग्गज कलाकार होत्या. त्यांनी केवळ लावणी आणि तमाशा यांसारख्या पारंपरिक लोककला जिवंतच ठेवल्या नाहीत, तर त्यांना जागतिक स्तरावर नवी ओळखही मिळवून दिलीय. त्यांना राष्ट्रपती पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलेलं. इतक्या महान व्यक्तिमत्त्वावर आधारित असूनही सिनेमाला ‘ईठा’ असं नाव का दिलंय? यावरून आता वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) चित्रपट आणि सांस्कृतिक विभागानं श्रद्धा कपूरच्या बहुचर्चित सिनेमाच्या शीर्षकावर आक्षेप नोंदवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पत्रक जारी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी यासंदर्भात एक अधिकृत पत्र जारी केलंय. विठाबाई नारायणगावकर यांचं जीवन आणि त्यांनी केलेला संघर्ष यांवर आधारित सिनेमाची निर्मिती ही महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी आणि संपूर्ण देशासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे, असं त्यांनी नमूद केलंय. मात्र, सिनेमाला ‘ईठा’ (Itha) असं नाव देणं कोणत्याही दृष्टीनं योग्य वाटत नाही. या दिग्गज कलावंत आणि त्यांच्या कलेचा योग्य सन्मान राखला जावा, अशी मागणी बाबासाहेब पाटील यांनी केलंय. त्यामुळे, सिनेनिर्मात्यांनी या चित्रपटाचं शीर्षक त्वरित बदलून ‘विठाबाई’ किंवा ‘विठा’ असं ठेवावं, जेणेकरून लोक त्यांच्या इतिहासाशी आणि व्यक्तिमत्त्वाशी थेट जोडले जाऊ शकतील.

दरम्यान, सोशल मीडिया युजर्सना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केलेला हा विरोध फारसा रुचला नाही. अनेक चाहत्यांनी यात काय लॉजिक आहे? अशी विचारणा केलीय. तसेच, ग्रामीण भागांत आजही कोणाता पूर्ण नाव घेण्याची रित नाही, असंही म्हटलंय. तसेच, ग्रामीण भागांत विठा नाव असलं तरीही ‘ईठा’ असंच म्हटलं जातं. आपल्या कलेच्या जोरावर विठाबाईंनी जगभरात अफाट आदर मिळवला हे सत्य असलं, तरी त्यांच्या जीवनावर आधआरित सिनेमाला ‘ईठा’ हे नाव देणं म्हणजे, त्यांच्याबद्दलचा अनादर नव्हे, उलट, त्यातून मातीशी असलेला त्यांचा घट्ट ऋणानुबंध आणि गावाकडची ती साधी-भोळी, अस्सल बोलीभाषा अधोरेखित होतेय, असंही अनेक युजर्सचं म्हणणं आहे.  

‘ईठा’चा टीझर 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *