कुत्रे, कबुतरे पाहण्यासाठी वेळ पण कॉकरोचकडे.. उद्धव ठाकरे यांची न्यायालयावर टीका – Marathi News | Uddhav Thackeray criticizes the judiciary takes aim against the backdrop of the Delhi protests


दिल्लीत जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे.  नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात आंदोलन केले जात आहे. आता मुंबईतही याच मुद्द्यात मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मुंबईत 26 तारखेला नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. यासोबतच सरकारवर गंभीर आरोप यादरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केले. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, काल एक मुलगी अस्वस्थ होती. एक एक अत्याचार वाढले आहेत. न्यायालयाला कुत्रे, कबुतरे पाहण्यासाठी वेळ आहे. पण कॉकरोचकडे पाहाला वेळ नाही. हे दुर्भाग्य आहे. देशाची परिस्थिती आणि न्यायालयाची परिस्थिती धृतराष्ट्रासारखी झाली आहे का.

द्रोपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखं झालं आहे. मध्यंतरी चंद्रचूड यांनी न्यायदेवतेची पट्टी काढली होती. ती न्यायदेवतेने परत बांधली का, कशासीठी बांधली आहे. सरकार आपलं वाटत नाही. आता विषय प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता नाही. हे सरकार नकोसं झालं आहे विद्यार्थ्यांना. याच विद्यार्थ्यांनी सरकारला निवडून दिलं आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केलं. त्यांनी बोलायला हवं होतं. कमीपणा बाळगण्याची गरज नव्हती. आपली मुलं आहेत. चर्चा करायला हवी होती. पहिल्याच दिवशी या मुलांशी बोलायला हवं होंत. लोकांना राग व्यक्त करायचा आहे. इतक्या दिवसाचा राग उफाळून आला आहे. त्याला वाट मोकळी करून देण्याचं काम करत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जात आंदोलकांची भेट घेतली होती. अमित ठाकरेही आंदोलकांना भेटण्यासाठी गेले होते. त्यामध्येच आता 26 तारखेला मुंबईत मोर्चा निघणार आहे. राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसणार आहे. कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलनासंदर्भात आता मुंबईत मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. दिल्लीत इंटरनेट सेवा बंद करण्याचाही निर्णय या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *