Samay Raina: समय रैनाकडून तारीख जाहीर; ‘इंडियाज गॉट लेटेंट’ सीझन 2चा पहिला एपिसोड कधी होणार रिलीज? आलिया भट्ट अन्.. कोणकोणते पाहुणे दिसणार


Samay Raina: मागच्या वर्षी ‘इंडियाज गॉट लेटेंट’ (Indias Got Latent) या शोमुळे चर्चेत आलेला कॉमेडियन समय रैना (Samay Raina) अल्पावधीतच प्रकाशझोतात आला. या शोमुळे तो वादात अडकला होता. त्याच्यावर प्रचंड टीका झाली. समयच्या शोमध्ये रणवीर अल्लाहबादियाने (Ranvir Allahbadia) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे समय रैनाही अडकला. दरम्यान, आता समय रैना पुन्हा एकदा ‘इंडियाज गॉट लेटेंट’मुळे चर्चेत आला आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ चा दुसरा सिझन आजपासून सुरू होणार आहे. 20 जून रोजी ‘इंडियाज गॉट लेटेंट’ (Entertainment)  चा पहिला एपिसोड नेटफ्लिक्स आणि यूट्यूब दोन्ही  प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. यासंबंधित नेटप्लिक्सने एक मजेशीर व्हिडीओ प्रोमोही सोशल मीडियात शेअर केला आहे. सध्या नेटफ्लिक्सने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  दरम्यान, या शोचा दुसरा पार्ट आपल्याला सायंकाळी पाहता येईल.

प्रचंड वादानंतर समय रैना पुन्हा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ सीझन 2 घेऊन येणार (Samay Raina Indias Got Latent Season 2 stream on Netflix)

‘इंडियाज गॉट लेटेंट’ चा पहिला सीझन फक्त यूट्यूबवर रिलीज झाला होता. समय रैनाच्या यूट्यूब चॅनलवर सगळे एपिसोड्स पोस्ट केले जात होते.   हे एपिसोड्स पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांना मेंबरशिप घ्यायला लागत होती. दरम्यान, त्याच्या शोवर बंदी घातल्यानंतर सोशल मीडियातून त्याचे  एपिसोड्सही डिलिट करण्यात आले.  दरम्यान, आता ‘इंडियाज गॉट लेटेंट’ च्या दुसऱ्या पार्ट्सचे एपिसोड्स नेटफ्लिक्सवरही पोस्ट केले जाणार आहेत.   

नेटफ्लिक्सने याचा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे. या व्हिडीओत समयने सांगितलं की,  यूट्यूब आणि नेटफ्लिक्स या दोन्ही प्लॅटफॉर्मवर ‘इंडियाज गॉट लेटेंट’ च्या दुसऱ्या पार्टचा पहिला एपिसोड शेअर केला जाणार आहे.  समय रैनाने या शोच्या संबंधित पोस्टही सोशल मीडियात शेअर केली आहे.  

‘इंडियाज गॉट लेटेंट’ च्या दुसऱ्या पार्ट्सच्या पहिल्या एपिसोडचे गेस्ट कोण?

मिळालेल्या माहितीनुसार, समय रैनाने पहिल्या भागातील पाहुण्यांची यादी जाहीर केली आहे.  ‘इंडियाज गॉट लेटेंट’  सीझन 2 च्या पहिल्या भागात शरवरी वाघ, आलिया भट्ट आणि आशिष सोळंकी  येणार आहेत.  या शोसाठी आलेले कंटेस्टंट आपलं टॅलेंट पाहुण्यांसमोर सादर करतात.  दरम्यान,  दुसऱ्या सीझनमध्ये नक्की कोणकोणती  धमाल पाहायला मिळणार, हे लवकरच समोर येईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

थाटामाटात की खासगीत? आमिर खान गौरीसोबत कसं अन् कधी लग्न करणार? स्वत:च केला खुलासा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *