उल्हासनगरात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, नगरसेवक विकी सिंग लबाना यांचे पद रद्द, नेमकं कारण काय?


Ulhasnagar News : उल्हासनगर महानगरपालिका राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत पॅनल क्रमांक 6 “अ” मधून निवडून आलेले नगरसेवक विकी सिंग लबाना यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समिती, नाशिक यांनी विकी सिंग लबाना यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे.

जात पडताळणी प्रक्रियेत त्रुटी आढळल्याने त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले

विकी सिंग लबाना यांनी “बंजारा” जातीचे प्रमाणपत्र सादर करून नागरिकांचा मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. मात्र जात पडताळणी प्रक्रियेत त्रुटी आढळल्याने त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले. यानंतर उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी अधिकृत आदेश काढत विकी सिंग लबाना यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *