Star Pravah: स्टार प्रवाहवरील आगामी ‘विसरू नको तू मला’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. 29 जूनपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि अभिनेत्री तन्वी मुंडले यांची फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे. कोकणातील निसर्गरम्य गुहागरमध्ये या मालिकेचं शूटिंग सुरू असून, सुंदर लोकेशन्स, नवी जोडी आणि भावनिक प्रेमकथा यामुळे मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
या मालिकेत शाल्व ‘सूर्या तांडेल’ ही महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारत आहे. नाखवा कुटुंबातील सूर्या हा घरातील सर्वांचा लाडका, जबाबदार आणि मेहनती मुलगा आहे. बाहेरून रांगडा आणि कणखर दिसणारा सूर्या मनाने मात्र खूप प्रेमळ, दिलदार आणि मदतीला धावून जाणारा आहे. त्याच्या जन्मानंतर कुटुंबाच्या व्यवसायाला भरभराट मिळाल्यामुळे घरातील प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात त्याच्या हस्तेच केली जाते. त्यामुळे तो घरासाठी लकी चार्म मानला जातो.
भूमिकेसाठी चार महिन्यात ट्रान्सफॉरमेशन
या भूमिकेसाठी शाल्वने स्वतःमध्ये मोठा बदल घडवून आणला आहे. सूर्या साकारण्यासाठी त्याने तब्बल चार महिने आपल्या फिटनेसवर मेहनत घेतली आहे. योग्य आहार, कठोर डाएट प्लॅन आणि दररोज तीन तासांचा वर्कआऊट करत त्याने स्वतःचा लूक पूर्णपणे बदलला आहे.
याबाबत बोलताना शाल्व म्हणाला, “सूर्या हा नारळासारखा आहे. वरून कडक वाटतो, पण आतून तितकाच गोड आणि मोठ्या मनाचा आहे. या भूमिकेसाठी गेल्या चार महिन्यांपासून मी माझ्या फिजिकवर मेहनत घेत आहे. योग्य आहार आणि रोजचा तीन तासांचा व्यायाम हा आता माझ्या आयुष्याचा भाग बनला आहे. या भूमिकेमुळे माझ्यात सकारात्मक बदल घडले आहेत.”
शाल्वचा हा फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन आणि कोकणाच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी प्रेमकथा प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे. आता ही नवी लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या मनावर किती छाप पाडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ‘विसरू नको तू मला’ ही मालिका 29 जूनपासून दररोज सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष