Ben Stokes: इंग्लंड संघातून काढलं, आता बेन स्टोक्स या संघाकडून खेळणार – Marathi News | Ben Stokes dropped from the England squad now play for Durham in the County Championship


Ben Stokes: इंग्लंड संघातून काढलं, आता बेन स्टोक्स या संघाकडून खेळणारImage Credit source: PTI

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याचं नेतृत्व जो रूट करत आहे. कारण नाइट क्लबमध्ये झालेल्या राड्यानंतर बेन स्टोक्सवर कारवाई करण्यात आली आहे. त्याने दारूच्या नशेत नाइट क्लबमध्ये मारामारी केली होती. त्यामुळे संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. असं असताना बेन स्टोक्स पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. पण बेन स्टोक्स इंग्लंड संघात नाही तर काउंटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. डरहम संघाने त्याला काउंटी क्रिकेटसाठी संघात जागा दिली आहे. 15 सदस्यीय संघात बेन स्टोक्सचं नाव सहभागी करण्यात आलं आहे. शुक्रवारपासून नॉर्थम्प्टनशरविरुद्ध डरहम यांच्यात काउंटी चॅम्पियनशिप सामना खेळला जाणार आहे. स्टोक्ससोबत गस एटकिंसन यालाही देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली आहे. एटकिंसन सर्रेसाठी ग्लेमॉर्गनविरुद्धच्या सामन्यात खेळणार आहे.

बेन स्टोक्सने लॉर्ड्स कसोटी विजयानंतर काय केलं?

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि वाद हे आता नवीन राहिलं नाही. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर त्याने संघाच्या नियमांचं उल्लंघन केलं होतं. विजयोत्सव साजरा करण्यासाठी लंडनच्या एका नाइटक्लबमध्ये गेला होता. या क्लबमध्ये दारू प्यायली आणि त्यानंतर गस एटकिंसनसह एका रग्बी खेळाडूला मारलं. बेन स्टोक्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने तात्काळ कारवाई केली. त्याला ओवल कसोटीतून बाहेरचा रस्ता दाखवला गेला. आता बेन स्टोक्सची चौकशी सुरू असून यापुढे स्टोक्सला संघात स्थान मिळेल की नाही याबाबत शंका आहे.

बेन स्टोक्स आणि वाद यांचं एक नातं आहे. करिअरच्या सुरूवातीलाच त्याने दारू पिऊन अनेक नियम मोडले होते. 2011 मध्ये दारूच्या नशेत डरहममध्ये पोलिसांशी वाद घातला होता. त्यानंतर पोलिसांनी समज देऊन सोडलं होतं. त्यानंतर 2013 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून घरी पाठवलं होतं. तेव्हाही दारूच्या नशेत इंग्लंड लायन्स संघाचे नियम तोडले होते. 2014 मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यातही त्याने असं केलं होतं. रागाच्या भरात ड्रेसिंग रूमच्या लॉकरवर पंच मारला होता आणि त्यात हाताला फ्रॅक्चर झालं होतं. त्यामुळे 2014 टी20 वर्ल्डकप खेळू शकला नव्हता. बेन स्टोक्सने 2017 मध्ये ब्रिस्टलच्या नाइटक्लबमध्ये असाच धिंगाणा घातला होता. तेव्हा दोन लोकांसोबत मारामारी केली होती. तेव्हाही त्याने दारू प्यायली होती. तेव्हा त्याच्यावर 30 हजार पाउंड दंड आणि 8 सामन्यांची बंदी घातली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *