Guru Pushya Nakshatra Parivartan : ज्योतिष शास्त्रानुसार, देवगुरु बृहस्पती ग्रह 18 जून 2026 रोजी म्हणजेच आज रात्री 9 वाजून 32 मिनिटांनी पुनर्वसु नक्षत्रातून पुष्य नक्षत्रात संक्रमण करणार आहे. हा नक्षत्र शनि देवाशी संबंधित आहे. त्यामुळेच याचा प्रभाव सर्व राशींवर सकारात्मक-नकारात्मक दिसून येणार आहे. ज्योतिषीय मान्यतेनुसार, कर्क, कन्या आणि धनु राशींच्या लोकांना यामुळे विशेष लाभ मिळू शकतो. गुरुच्या या नक्षत्रात येण्याने करिअर आणि आर्थिक स्थितीशी संबंधित बाबतीतही तुम्हाला सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतात.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी गुरु ग्रहाचा पुष्य नक्षत्रात होणार प्रवेश लाभदायी मानला जाणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तुमच्यात सकारात्मक ऊर्जा राहील. तसेच, वैवाहिक जीवनात गोडवा दिसून येईल. या कालावधीत तुम्हाला एखादी शुभवार्ता देखील ऐकायला मिळू शकते. पैशांशी संबंधित तुमच्या समस्या नष्ट होतील. तुम्हाला मानसिक शांती मिळेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण चांगले परिणाम घेऊन येणार आहे. या कालावधीत तुमच्या वाणीने लोक प्रभावित होतील. व्यवसायाशी संबंधित एखादी महत्त्वाची डील तुमच्या हाती लागू शकते. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेल्या प्रोजेक्टवर तुम्हाला काम करण्याची संधी मिळेल. तुमच्या कामाला गती येईल. नातेसंबंध अधिक घट्ट होतील.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी गुरुचं हे नक्षत्र परिवर्तन फलदायी ठरणार आहे. या काळात समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण राहील. तसेच, घरातील वातावरण देखील आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला कोणताही चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल.
उपाय
ज्योतिषीय मान्यतेनुसार, गुरु ग्रहाची शुभता प्राप्त करण्यासाठी काही विशेष उपाय करणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्ही पिवळ्या वस्तूंचं दान करु शकता. या व्यतिरिक्त नियमितपणे ‘ऊॅं बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा जाप करु शकता. तसेच, केळ्याच्या झाडाची पूजा केल्याने देखील गुरु ग्रहाची कृपा प्राप्त करु शकता.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Guru Nakshatra Parivartan 2026 : अखेर आलीच ती वेळ…! गुरु-पुष्य नक्षत्रामुळे 5 राशींवर ओढावणार आर्थिक संकट, लवकरच कोसळणार दु:खाचा डोंगर, सावध व्हा
BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report