FIFA World Cup Marathi Post: इकडं राहुल नार्वेकरांना नीट मराठी वाचता येईना अन् तिकडं फुटबाॅल वर्ल्डकपला मराठीचा तडका, ‘रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय’ फिफाच्या पोस्टवर कमेंटमधून मराठी गर्जना


FIFA World Cup Marathi Post: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेमध्ये शोकप्रस्ताव मांडताना ज्या काही गंभीर चुका केल्या, त्यामुळे त्यांच्यावर राज्यभरातून सडकून टीका सुरू आहे. त्यांनी ज्या पद्धतीने शोकप्रस्ताव वाचला यामुळे मराठीचीच अब्रू निघाली, इतकेच नव्हे तर लक्तरे वेशीवर टांगली गेली, अशीच भावना मराठी जनांमधून उमटली. दरम्यान, राहुल नार्वेकर यांच्या मराठी वाचनावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा हल्लाबोल केला. दुसरीकडे, चौफेर टीकेनंतर राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी विधानसभेमध्ये बोलताना “मी जवळपास गेल्या साडेचार वर्षांपासून विधानसभेचा अध्यक्ष आहे. 12 शोक प्रस्ताव होते, त्यामध्ये फॉन्ट छोटा होता, त्यामध्ये काही तांत्रिक चुका होत्या, त्यामुळे ते मी नीट पद्धतीने वाचू शकलो नाही,” अशी प्रतिक्रिया दिली.

“रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय”

दरम्यान, आता इकडे राहुल नार्वेकर यांच्या एकंदरीत मराठी वाचनावरून हल्लाबोल सुरू असतानाच, फिफाने (FIFA) मात्र कडक मराठी तडका दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील मातृभाषांमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न फिफा वर्ल्डकप निमित्ताने होत आहे. आजही सोशल मीडियामध्ये फिफाकडून एक पोस्ट करण्यात आली असून, ती जबरदस्त चर्चेचा आणि सोशल मीडियामध्ये कमेंटचा विषय झाला आहे. फिफाने पोस्ट करताना “रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय” असं म्हणत रॉनाल्डोच्या फोटोसह पोस्ट केली आहे. या पोस्टवर हजारो कमेंट मराठी जणांकडून पडल्या आहेत. यामध्ये अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे. त्यामुळे काहींनी या “मराठीत मराठी, त्यात कोल्हापुरी मराठी, कोल्हापुरी दणका, कोल्हापुरी विषय, मराठीचा वाजतोय डंका,” अशा अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कोल्हापुरात चौकाचौकांमध्ये कटआऊट्स  

इतकेच नव्हे तर “जगात भारी कोल्हापुरी” असा सुद्धा सूर या पोस्टवर उमटला आहे. त्यामुळे एकंदरीतच फिफाने जगभरातील मातृभाषांमधून, तसेच विशेष करून भारतीय मातृभाषांमधून जो चाहत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे, त्याची चांगलीच चर्चा होत आहे. दुसरीकडे, कोल्हापूर फुटबॉलचे माहेरघर आहे. जवळपास शेकडो फुटबॉल वर्ल्डकप निमित्ताने बॅनर्स उभा राहिले आहेत. चौकाचौकांमध्ये कटआऊट्स आणि बॅनर लावण्यात आले आहेत. यामध्ये अर्जेंटिना, ब्राझील, पोर्तुगाल देशांविषयी विशेष आकर्षण असल्याचं दिसून येत आहे. मात्र सर्वाधिक मेस्सी प्रेमी जनता कोल्हापूरमध्ये असल्याचं लावलेल्या होर्डिंग्समधून आणि कटआऊटमधून समोर येत आहे. त्यामुळे कोल्हापुरी चाहत्यांमध्ये रोनाल्डो विरुद्ध मेस्सी चाहते असाच एकंदरीत सामना पाहायला मिळत आहे. कोल्हापूरच्या फुटबॉलची चुरशीने जी स्पर्धा होत असते किंवा जो संघर्ष होत असतो, तो नेहमीच छत्रपती शाहू स्टेडियमवर पाहायला मिळत असतो.

इतर महत्वाच्या बातम्या

इतर महत्वाच्या बातम्या





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *