Weekly Horoscope 27 July To 2 August 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै (July 2026) महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. कारण, या आठवड्याच्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सिंह आणि कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मिथुन रास साप्ताहिक राशीभविष्य (Gemini Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) : प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. जोडीदारासोबत रोमँटिक क्षण अनुभवण्याची संधी मिळेल. अविवाहितांना मनासारखी व्यक्ती भेटू शकते. विवाहितांच्या आयुष्यात आनंद आणि समजूतदारपणा वाढेल.
आर्थिक स्थिती (Wealth) : आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, नवीन आठवड्यात उत्पन्नात वाढ होईल. गुंतवणुकीतून अपेक्षित लाभ मिळू शकतो. आर्थिक नियोजनामुळे भविष्यातील सुरक्षितता वाढेल.
करिअर (Career) : करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, हा आठवडा करिअरमध्ये मोठी प्रगती घेऊन येऊ शकतो. नवीन जबाबदारी, पदोन्नती किंवा महत्त्वाचा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रतिष्ठा आणि नफा दोन्ही वाढतील.
आरोग्य (Health) : जुलैच्या शेवटच्या आठवड्यात शारीरिक आणि मानसिक ऊर्जा उत्तम राहील. नियमित व्यायाम आणि संतुलित आहारामुळे आरोग्य अधिक चांगले राहील.
कर्क रास साप्ताहिक राशीभविष्य (Cancer Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) : जोडीदारासोबतचे नाते अधिक विश्वासपूर्ण होईल. काहींसाठी विवाह किंवा साखरपुड्याची चर्चा पुढे सरकू शकते. प्रेमसंबंधात संयम ठेवल्यास नात्यात गोडवा वाढेल.
करिअर (Career) : करिअरच्या बाबतीत नोकरीत नवीन संधी मिळतील. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. व्यवसायात नवीन करार, ग्राहक किंवा भागीदारीमुळे चांगला आर्थिक लाभ होईल. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतीत यशाचे संकेत आहेत.
आर्थिक स्थिती (Wealth) : आर्थिक अडचणी कमी होतील. बचत वाढेल. दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. घर किंवा कार्यालयाशी संबंधित खर्च होण्याची शक्यता आहे.
आरोग्य (Health) : आरोग्याच्या बाबतीत नवीन आठवडा पाठीचा त्रास, स्नायूंचा ताण किंवा थकवा जाणवू शकतो. नियमित चालणे, योग आणि पुरेशी विश्रांती घेतल्यास आरोग्य चांगले राहील..
हेही वाचा :
Ashadhi Ekadashi 2026: उद्या आषाढी एकादशी, भगवान विष्णूंची योगनिद्रा, पंढरीची वारी, शुभ मुहूर्त ते पारणाची वेळ! महत्त्व, पौराणिक कथेसह संपूर्ण माहिती एका क्लिकवर ..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)