Shahrukh Khan on CJP: सलमाननंतर शाहरुख खाननेही CJPच्या आंदोलनाला पाठिंबा दिला? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय? जाणून घ्या खरं


Does Shahrukh Khan Supports NEET: सलमान खान (Salman Khan), प्रकाश राज,  आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, करिना कपूर खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी दिल्लीतील जंतर – मंतर येथे सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलं.  नीट पेपर फुटी (NEET Protest) प्रकरण सध्या अधिक चिघळत चाललं आहे. 20 जुलै रोजी जंतर मंतर येथून विद्यार्थी आंदोलक संसद भवनाबाहेर गेले, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी केली.  परिस्थिती अधिक बिघडल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. यानंतर बॉलिवूड कलाकारांनी या घटनेचा निषेध नोंदवला. सलमान खानने देखील या आंदोलनाचं कौतुक केलं.  सलमान खाननंतर शाहरुख खानने या आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. शाहरुख खानने खरंच या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे का? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय? जाणून घेऊयात.

शाहरुख खानने नीट आंदोलनाच्या समर्थनार्थ कोणती पोस्ट शेअर केली? (Shah rukh khan NEET Protest Viral Post)

खरंतर, व्हायरल  स्क्रिनशॉट हे रिअल नाही तर फेक आहे. शाहरुख खानने आतापर्यंत कोणतीही अधिकृत  पोस्ट शेअर केलेली नाही.  अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.   व्हायरल  स्क्रिनशॉट फेक असल्याची माहिती समोर आली आहे. स्क्रिनशॉटमध्ये लिहिलं आहे की, ‘सर्व प्रिय विद्यार्थ्यांनो.. पुस्तक, लेखणी आणि आवाज..  खरी ताकद कुठे आहे, हे तुम्ही दाखवून दिले आहे. तुमचं प्रोटेस्ट केवळ परिक्षापुरते मर्यादित नाही.  तर ट्रान्सपरेंट आणि फेअर सिस्टसाठी हा लढा आहे’.

‘प्रत्येक विद्यार्थ्यांचे मुल्यमापन  हे त्याच्या मेहनतीवरुन व्हायला हवे. कोणत्याही पेपरफुटीवरुन नाही. हा लढा आवश्यक आहे.  तरुण वर्ग आपले भवितव्य आहे.  तुम्ही थकून गेला असाल किंवा निराश झाले असाल, पण हार मानू नका. तुमचे म्हणणे शांतपणे मांडा. तुम्ही तुमच्या हक्कांसाठी लढत राहा.  पण स्वत:ला सुरक्षित ठेवा’, असं शाहरुखने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

‘देशातील नेते, अधिकाऱ्यांनी   आपल्या विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला पाहिजे.  विद्यार्थ्यांच्या   प्रश्नांची गांभीर्याने दखल घ्यायला हवी.  तसेच सुधारणा करायला हवी. जेणेकरुन इतर कोणत्याही विद्यार्थ्यांना सहन करावे लागणार नाही.  मी इमोशनली आणि मोरली विद्यार्थ्यांसोबत आहे’, असं पोस्टमध्ये म्हणण्यात आलं आहे.  ही पोस्ट शाहरुख खान या बॉलिवूड अभिनेत्याच्या नावाने व्हायरल होत असून,  ही पोस्ट फेक असल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

‘धुरंधर’चा रेकॉर्ड मोडला, ‘छावा’ सिनेमालाही पछाडलं, थलपती विजयच्या ‘जना नायकन’नं ओपनिंग डेला किती कोटी कमावले?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *