Jofra Archer : जोफ्रा आर्चरने क्रिकेटमध्ये दाखवले फुटबॉलचे स्किल, पायाने थ्रो करून अक्षर रन आऊट | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

भारताविरुद्धच्या चौथ्या सामन्यात जोफ्रा आर्चरने त्याच्या फुटबॉलचं स्किलही दाखवून दिलं. इनिंगच्या शेवटच्या बॉलला जोफ्रा आर्चरने पायाने थ्रो करून अक्षर पटेलला रन आऊट केलं.

जोफ्रा आर्चरने क्रिकेटमध्ये दाखवले फुटबॉलचे स्किल, पायाने थ्रो करून अक्षर रन आऊट
जोफ्रा आर्चरने क्रिकेटमध्ये दाखवले फुटबॉलचे स्किल, पायाने थ्रो करून अक्षर रन आऊट

ब्रिस्टल : टीम इंडिया इंग्लंडमध्ये टी-20 सीरिज खेळत असतानाच जगभरात फुटबॉल फिवर आहे. फिफा वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलचा थरार सुरू झाला आहे, त्यात क्रिकेटही मागे राहिलं नाही. भारताविरुद्धच्या चौथ्या सामन्यात जोफ्रा आर्चरने त्याच्या फुटबॉलचं स्किलही दाखवून दिलं. इनिंगच्या शेवटच्या बॉलला जोफ्रा आर्चरने पायाने थ्रो करून अक्षर पटेलला रन आऊट केलं.

या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 158 रन केल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने 49 बॉलमध्ये नाबाद 80 रन केले. याशिवाय शिवम दुबेने 22 रनचं योगदान दिलं. टीम इंडियाचे इतर बॅटर मात्र अपयशी ठरले. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि जॉश टंगला 2-2 विकेट मिळाल्या तर विल जॅक्स आणि आदिल रशीद यांनी 1-1 विकेट घेतली.

वैभव सूर्यवंशी पुन्हा फेल

आयपीएल 2026 मध्ये धमाकेदार कामगिरी करणारा वैभव सूर्यवंशी त्याच्या सलग तिसऱ्या सामन्यामध्ये अपयशी ठरला. 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वैभवने फक्त 13.5 च्या सरासरीने आणि 168 च्या स्ट्राईक रेटने 42 रन केले.

टीम इंडिया अजूनही विजयाच्या प्रतिक्षेत

टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाला अजून एकही विजय मिळवता आलेला नाही. आयर्लंडविरुद्धच्या 2 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये टीम इंडियाचा 2-0 ने पराभव झाला तर इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आणि पुढचे दोन्ही सामने टीम इंडियाने गमावले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *