Duleep Trophy 2026 Vaibhav Suryavanshi : भारतीय क्रिकेटचा 15 वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या ‘दिलीप ट्रॉफी 2026’ स्पर्धेत आपल्या चमकदार कामगिरीने तुफान चर्चेत आहे. या स्पर्धेत त्याला ईस्ट झोन संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. नॉर्थ ईस्ट झोनविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात वैभवला बॅटने फारशी कमाल दाखवता आली नाही, परंतु त्याने अप्रतिम गोलंदाजी करत 2 बळी टिपले. त्याची बॉलिंग ॲक्शन पाहून क्रिकेट चाहत्यांसह माजी खेळाडूही थक्क झाले असून, टीम इंडियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने त्याच्या ॲक्शनवर दिलेली प्रतिक्रिया सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
युवराज सिंगने वैभवच्या गोलंदाजीच्या ॲक्शनवर भाष्य करताना त्याची ॲक्शन स्वतःपेक्षा उत्तम असल्याचे म्हटले आहे. युवीने इंस्टाग्रामवर वैभवच्या बॉलिंगवर कमेंट करताना लिहिले, “माझ्या ॲक्शनपेक्षा तर उत्तम आहे,” आणि त्यासोबत हसणारा इमोजीही पोस्ट केला. राजस्थान रॉयल्सने युवीची ही कमेंट आणि वैभवच्या गोलंदाजीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Now you can’t unsee it 😂🔥 pic.twitter.com/fO4dhZFikZ
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) August 31, 2026
Vaibhav Suryavanshi Bowling Performance : 3 षटकांत घेतलेले 2 बळी
महत्त्वाची बाब म्हणजे या सामन्यात वैभवने केवळ 3 षटके गोलंदाजी केली, ज्यामध्ये त्याने अवघ्या 11 धावा देत 2 महत्त्वाचे बळी मिळवले. विकेट घेतल्यानंतर वैभवने स्वतःला ‘विकेट टेकर’ असेही म्हटले होते. सुरुवातीला कर्णधार ईशान किशन आपल्याला चेंडू सोपवण्यास कचरत होता, असा मजेशीर खुलासाही वैभवने यानंतर केला होता.
Duleep Trophy Semifinal : सेमीफायनलमध्ये वैभवची वादळी फलंदाजी
दिलीप ट्रॉफीचा पहिला उपांत्य सामना ईस्ट झोन आणि सेंट्रल ईस्ट झोन यांच्यात खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात ईस्ट झोनकडून खेळताना वैभवने आक्रमक फलंदाजी केली. त्याने अवघ्या 81 चेंडूंत 7 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 92 धावांची धडाकेबाज खेळी केली. मात्र, येथेही त्याचे शतक अवघ्या 8 धावांनी हुकले. याआधीही काही सामन्यांमध्ये तो शतकाच्या जवळ पोहोचून बाद झाला आहे.
Vaibhav Suryavanshi First Class Career : वैभव सूर्यवंशीची फर्स्ट क्लास कारकीर्द
वैभव सूर्यवंशीच्या प्रथम श्रेणी (First Class) कारकिर्दीवर नजर टाकल्यास, त्याने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. दिलीप ट्रॉफीचा उपांत्य सामना हा त्याचा 10 वा सामना ठरत आहे. आतापर्यंत खेळलेल्या 13 डावांमध्ये फलंदाजी करताना वैभवने 215 धावा केल्या असून, 93 ही त्याची या प्रकारातील सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या राहिली आहे.
ही बातमी वाचा: