Vaibhav Sooryavanshi : आठवडाभरानंतर पुन्हा वैभव सूर्यवंशीचा धमाका! आता भारतीय संघाकडून खेळताना दिसणार 15 वर्षीय युवा स्टार; जाणून घ्या संपूर्ण Schedule


Vaibhav Sooryavanshi India A Tri-Series Schedule : आयपीएल 2026 मध्ये आपल्या तडाखेबाज फलंदाजीने क्रिकेटप्रेमींच्या मनावर राज्य करणारा 15 वर्षीय युवा स्टार वैभव सूर्यवंशी आता पुन्हा एकदा मैदानात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. राजस्थान रॉयल्सकडून शानदार कामगिरी केल्यानंतर वैभवची भारतीय अ संघात निवड झाली असून तो श्रीलंकेत होणाऱ्या त्रिराष्ट्रीय मालिकेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. कारण आयपीएल संपल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच वैभव पुन्हा एकदा क्रिकेट मैदानावर चौकार-षटकारांची आतषबाजी करताना दिसणार आहे. भारत अ, श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ या तीन संघांमध्ये ही मालिका खेळवली जाणार आहे.

तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार (Tilak Verma Captain India A)

या स्पर्धेसाठी भारत अ संघाचे नेतृत्व तिलक वर्माकडे सोपवण्यात आले आहे. तर ऋतुराज गायकवाडला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सुरुवातीला रियान परागला उपकर्णधार बनवण्यात आले होते. मात्र दुखापतीमुळे त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली. वैभव सूर्यवंशीसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. कारण प्रथमच त्याला भारत अ संघाकडून लिस्ट-ए क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे. याआधी तो कतारमध्ये झालेल्या इमर्जिंग एशिया कपदरम्यान भारतीय शॅडो संघाचा भाग होता.

9 जूनला पहिली लढत (India A Tri-Series Schedule)

भारत अ संघ आपल्या मोहिमेची सुरुवात 9 जून रोजी यजमान श्रीलंका अ संघाविरुद्ध करणार आहे. त्यानंतर अफगाणिस्तान अ आणि पुन्हा श्रीलंका अ विरुद्ध सामने खेळले जाणार आहेत. या मालिकेत दमदार प्रदर्शन केल्यास वैभवसाठी भारतीय वरिष्ठ संघाचे दरवाजे आणखी खुले होऊ शकतात.

भारत अ संघाची संभाव्य ताकद

फलंदाजी विभागात प्रियंश आर्य, वैभव सूर्यवंशी, आयुष बडोनी, समीर रिजवी, प्रभसिमरन सिंग, कुमार कुशाग्र आणि निशांत सिंधू यांसारखे प्रतिभावान खेळाडू संघात आहेत. तर अष्टपैलू विभागात हर्ष दुबे महत्त्वाची भूमिका बजावतील. गोलंदाजीची जबाबदारी विजय कुमार, यश ठाकूर, युवराज सिंग, अंशुल कंबोज आणि अरशद खान यांच्या खांद्यावर असेल.

वैभव सूर्यवंशीवर निवड समितीचे विशेष लक्ष (Selection Committee focus on Vaibhav Sooryavanshi)

आयपीएलमधील विस्फोटक कामगिरीमुळे वैभव सूर्यवंशीकडे निवड समितीचे विशेष लक्ष आहे. त्यामुळे श्रीलंकेतील या मालिकेत त्याने मोठी खेळी केल्यास आगामी आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकांसाठी त्याच्या नावाचा गंभीरपणे विचार केला जाऊ शकतो. क्रिकेट चाहत्यांना आता फक्त काही दिवसांची प्रतीक्षा आहे. आयपीएलमध्ये धुमाकूळ घालणारा हा युवा स्टार पुन्हा एकदा भारतीय जर्सीत मैदान गाजवताना दिसणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

हे ही वाचा –

IND vs AFG Playing XI : शुभमन गिलचा लाडका खेळाडू OUT, पडिक्कलला IN…; अफगाणिस्तानविरुद्ध कसोटीत अशी असणार टीम इंडियाची खतरनाक Playing XI

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *