Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर.. – Marathi News | Gold silver price today 22 July 2026 check sone chandi rate in your city 24 and 18 carat prices delhi mumbai pune jalgaon maharshtra


Gold Rate Today in India: गेल्या आठवड्यात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर कमी दरांचा फायदा घेत गुंतवणूकदारांनी पुन्हा सोन्याची खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतींना आधार मिळाला असून त्यात पुन्हा तेजी दिसून येत आहे. याशिवाय, अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्यानेही सोन्याच्या दरांना बळ मिळाले आहे. वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य लोकांचं सोनखरेदीचं स्वप्न मात्र धूसर होताना दिसत आहे. राजधानी दिल्लीत आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ नोंदवली गेली. या तीन दिवसांत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 940 रुपयांनी, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 860 रुपयांनी वाढला आहे. आजच्या व्यवहारात 24 कॅरेट आणि 22 कॅरेट या दोन्ही प्रकारच्या 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत नाममात्र 10 रुपयांची वाढ झाली आहे मात्र देशभरात सोन्याचे भाव चढेच आहेत.

सोन्यामुळे ग्राहकांचं टेन्शन वाढलं असलं तरी चांदीने थोडासा दिलासा दिला आहे. औद्योगिक मागणी कमी झाल्याने चांदीच्या किमतीत आज घसरण झाली आहे. कालच्या वाढीनंतर आज प्रति किलो 100 ची घट नोंदवली गेल्याची माहिती समोर आली आहे.

शहरांप्रमाणेच सोन्याचे दर घ्या जाणून

देशातील 10 प्रमुख शहरांमध्ये 10 ग्रॅम 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे ताजे दर आपण खालील चार्टमधून जाणून घेऊया.

चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण

सोनं वाढल्याने ग्राहकांना टेन्शन आलं, मात्र चांदीचे भाव न वाढल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. कालच्या वाढीनंतर आज प्रति किलो 100 रुपयांची घट नोंदवली गेली. यापूर्वी 20 जुलै रोजी चांदीच्या किमतीत 5,000 रुपये प्रति किलोची वाढ झाली होती. त्याआधी सलग दोन दिवस दर स्थिर राहिले होते. तसेच, 17 जुलै रोजी सलग पाच दिवसांच्या स्थिरतेनंतर चांदी ₹5,000 प्रति किलोने स्वस्त झाली होती. सध्या दिल्लीमध्ये एक किलो चांदीचा दर 2,34,900 रुपये इतका आहे. मुंबई आणि कोलकातामध्येही सध्या हाच दर लागू आहे. मात्र, चेन्नईमध्ये एक किलो चांदी 2,40,100 रुपये दराने विकली जात असून, चार प्रमुख महानगरांमध्ये सर्वाधिक महाग चांदी चेन्नईत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *