Song : अभिनेत्री संध्या यांचं ते गाणं, कैद्यांसाठी लिहिलं पण बनलं शाळेची प्रार्थना! तुमचंही असेल फेव्हरेट | ताज्या मनोरंजन बातम्या


Last Updated:

लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं, अभिनेत्री संध्या यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं. कैद्यांसाठी बनलेलं हे गाणं शाळेची प्रार्थना बनलं. तुमचंही असेल फेव्हरेट.

News18
News18

सिनेमांतील गाणी प्रेक्षकांच्या कायम ओठांवर असतात. सिनेमातील अनेक गाणी अजरामर झाली. फक्त सिनेमापूर्ती मर्यादीत न राहता ही गाणी लाखो प्रेक्षकांच्या आयुष्याचा भाग बनली. असंच एक गाणं जे जेलमधील कैद्यांसाठी बनवलं गेलं होतं पण पुढे जाऊन शाळेतील प्रार्थना बनलं. लता मंगेशकरांनी गायलेली आणि अभिनेत्री संध्या यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं हे गाणं आजही अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्येही हे गाणं तुम्ही ऐकलं असेल. 69 वर्षांनीही हे गाणं आजही तितकंच प्रसिद्ध आहे

आपण ज्या गाण्याविषयी बोलतोय ते गाणं म्हणजे ‘ऐ मालिक तेरे बंदे हम’. अनेक शाळांमध्ये हे गाणं प्रार्थना म्हणून गायलं जातं. पण प्रत्यक्षात हे गाणं जेलमधील कैद्यांसाठी लिहिण्यात आलं होतं.  भरत व्यास यांनी हे गाणं लिहिलं होतं.  दिग्दर्शक व्हि.शांताराम यांच्या 1957 साली आलेल्या दो आंखें बारह हाथ या सिनेमातील हे गाणं. सिनेमात व्हि. शांताराम यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री सध्या देखील यात महत्त्वाच्या भूमिकेत होत्या. या सिनेमाची गोष्ट एका जेलरची होती. जो गुन्हेगारांना शिक्षा देण्यापेक्षा त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यावर अधिक विश्वास ठेवतो.

सिनेमात एक इमोशनल सीन आहे. ज्यात कैद्यांना आपल्या चुक समजतात आणि ते ईश्वराकडे आम्हाला योग्य मार्ग दाखव अशी प्रार्थना करतात. तिथे हे गाणं वाजतं. लता दीदींनी हे गाणं गाजलं आहे. तर वसंत देसाई यांनी गाण्याला संगीत दिलं आहे. गाण्याच्या सुरेल संगीतामुळे हे गाणं आजही रसिकांच्या मनात घर करून आहे.

सिनेमातील हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. गाण्यात साधे शब्द, माणुसकीचा संदेश आणि प्रेरणादायी आशय असल्यामुले हे गाणं शाळेतील मुलांची प्रार्थना म्हणून घेण्याचं ठरलं.  आजही देशभरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी दिवसाची सुरुवात ‘ऐ मालिक तेरे बंदे हम’ या प्रार्थनेने करतात. चित्रपटासाठी लिहिलेलं हे गाणं पुढे अनेक पिढ्यांच्या आठवणींचा भाग बनलं.

राजस्थानमधील बिकानेर येथे जन्मलेले भरत व्यास हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मान्यवर गीतकारांपैकी एक मानले जातात. 1950 आणि 1960 च्या दशकात त्यांनी अनेक गाजलेली गाणी लिहिली. ‘ऐ मालिक तेरे बंदे हम’ व्यतिरिक्त ‘आधा है चंद्रमा रात आधी’, ‘अरे जा रे हट नटखट’, ‘तू छुपी है कहाँ’, ‘तुम गगन के चंद्रमा’, ‘लौट के आजा मेरे मीत’आणि ‘ये कौन चित्रकार है’ यांसारखी अनेक अजरामर गाणी त्यांच्या लेखणीतून साकारली.

मराठी बातम्या/मनोरंजन/

Song : अभिनेत्री संध्या यांचं ते गाणं, कैद्यांसाठी लिहिलं पण बनलं शाळेची प्रार्थना! तुमचंही असेल फेव्हरेट



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *