Somvati Amavasya 2026: आज सोमवती अमावस्येला 6 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ योगायोग बनला, कसा जाणार दिवस? 12 राशींचे राशीभविष्य…


Somvati Amavasya 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 13 जुलै 2026 ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे, कारण आज सोमवती अमावस्या येत आहे, सोमवारी येणाऱ्या अमावस्येला ‘सोमवती अमावस्या’ असे म्हटले जाते. हिंदू धर्मात या तिथीला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, आज अमावस्येच्या दिवशी, 12 राशींसाठी हा दिवस कसा असेल? आज जुळून येणाऱ्या दुर्मिळ योगायोगामुळे दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या….

मराठी दिनदर्शिकेनुसार सोमवती अमावस्या तिथी  (Somvati Amavasya 2026)

ज्येष्ठ अमावस्या: मंगळवार, 14 जुलै 2026
अमावस्या तिथी प्रारंभ: 13 जुलै 2026, सायंकाळी 6:50
अमावस्या तिथी समाप्ती: 14 जुलै 2026, दुपारी 3:12
या वर्षी जुलै महिन्यातील अमावस्या सोमवारी आल्यामुळे तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात.

सोमवती अमावस्या शुभ योग…

धार्मिक मान्यतेनुसार, सोमवारी येणाऱ्या अमावस्येला ‘सोमवती अमावस्या’ असे म्हटले जाते. हिंदू धर्मात या तिथीला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानले जाते. चंद्राचा दिवस (सोमवार) आणि अमावस्या यांचा दुर्मिळ संयोग झाल्याने या दिवसाचे धार्मिक महत्त्व वाढते.

12 राशींचे राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope Today)

आजचा दिवस मेष राशीसाठी कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कुटुंबातील एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल. शिवपूजा आणि पितरांचे स्मरण लाभदायक ठरेल.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

आजचा दिवस वृषभ राशीसाठी मनातील अनेक चिंता दूर होण्यास सुरुवात होईल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. धार्मिक कार्यात सहभाग घेण्याची संधी मिळेल.

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

आजचा दिवस मिथुन राशीसाठी अनावश्यक वाद टाळा. कामाच्या ठिकाणी संयम ठेवा. गुंतवणूक करताना घाई करू नका. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने नात्यात गोडवा वाढेल.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

आजचा दिवस कर्क राशीसाठी भाग्याची चांगली साथ मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यवसायात नवीन संपर्क लाभदायक ठरतील. मानसिक शांततेसाठी ध्यान किंवा जप करा.

सिंह रास (Leo Horoscope Today)

आजचा दिवस सिंह राशीसाठी आर्थिक बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. नोकरीत तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला फायदेशीर ठरेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

आजचा दिवस कन्या राशीसाठी नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल राहील. उत्पन्न वाढवण्याच्या संधी मिळू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. आध्यात्मिक कार्यांमध्ये मन रमू शकते.

तूळ रास (Libra Horoscope Today)

आजचा दिवस तूळ राशीसाठी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नोकरीत काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

आजचा दिवस वृश्चिक राशीसाठी करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. व्यवसायात नवीन योजना यशस्वी होऊ शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आत्मविश्वास वाढलेला दिसेल.

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

आजचा दिवस धनु राशीसाठी भाग्य आणि परिश्रम यांची उत्तम सांगड घालण्याची वेळ आहे. प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभाग लाभदायक ठरेल.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

आजचा दिवस मकर राशीसाठी कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढू शकते, पण तुमच्या मेहनतीमुळे यश मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या आणि विश्रांतीला प्राधान्य द्या.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

आजचा दिवस कुंभ राशीसाठी व्यवसायात नवीन करार किंवा संधी मिळू शकते. मित्रांकडून मदत मिळेल. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी होतील. मानसिक तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.

मीन रास (Pisces Horoscope Today)

आजचा दिवस मीन राशीसाठी आर्थिक स्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रगतीचे संकेत मिळतील. कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवाल. आध्यात्मिक साधना आणि दानधर्मातून मानसिक समाधान मिळेल.

हेही वाचा :

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 5 राशींची भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून जुलैचा नवा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *