Siya Goyal Lohagad Fort: सियाच्या कृत्याच्या धक्क्याने वडील ICUमध्ये, आई म्हणाली, ‘माझी मुलगी दोषी असेल तर तिलाही लोहगडावरुन ढकलून द्या’


Siya Goyal Lohagad Fort: पुण्यासह संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल हत्याप्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. केतन अग्रवाल हा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा होता. तो अवघ्या 22 वर्षांचा होता. त्याचे पुण्यातील (Pune news) सिया गोयल (वय 20) या तरुणीशी लग्न ठरले होते. मात्र, सिया गोयल (Siya Goyal) हिचे चेतन चौधरी (Chetan Chaudhari) या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या दोघांनी 18 जूनला केतन अग्रवाल याला लोहगडावरुन 400 फूट खोल दरीत ढकलून त्याची हत्या केली होती. सियाच्या या कृत्यानंतर तिच्या वडिलांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते सध्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत आहेत. सियाच्या आई-वडिलांनी रुग्णालयातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी या दोघांनाही सिया दोषी असेल तर तिला कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे स्पष्टपणे सांगितले. (Pimpri Chinchwad Crime news)

यामध्ये जो कोणी दोषी असेल तर त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, मग माझी मुलगी का असेना. माझ्या मुलीचा दोष असेल तर माझ्या मुलीला लोहगडावर केतनला जिथून ढकलून दिले होते तिथूनच ढकला, असे सियाची आई पूजा गोयल यांनी म्हटले. सियाचे वडील प्रवीण गोयल यांनीही, जे दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे मत व्यक्त केली. केतन अग्रवाल याचे कुटुंबीय सियाबाबत आता जे काही बोलत आहेत, त्यांनी या गोष्टी आधीच आम्हाला सांगायला पाहिजे होत्या. तुमची मुलगी जे करतेय ते चांगलं नाही, तुम्ही तिला समज द्या, असे त्यांनी सांगायला हवे होते. आम्ही आमच्या मुलीला समजावलं असतं, ओरडलो असतो, काहीतरी केलं असतं, असे सियाच्या वडिलांनी म्हटले. 

मी आजपर्यंत चेतन चौधरी याचा चेहरा पाहिलेला नाही. मी त्याला कधी भेटलो किंवा त्याच्याशी कधी बोललोही नाही. तो कधी घरीही आला नव्हता. किंबुहान आम्ही कधी सियाच्या तोंडून त्याचं नावंही ऐकले नव्हते, असेही सिया गोयल हिच्या वडिलांनी स्पष्ट केले. सियाच्या वडिलांनी केतन अग्रवाल याच्या कुटुंबाबत बोलताना म्हटले की, ते चांगले आणि संस्कारी लोक आहेत. आमचे अनेक वर्षांपासून कौटुंबिक संबंध आहेत. देवीचंद गोयल हे अनेकदा आमच्या ड्रायफुटचा व्यवसाय असणाऱ्या दुकानात यायचे, खूप सामान घेऊन जायचे. ते स्वभावाला खूप चांगले होते. या घटनेमुळे आम्ही एका चांगल्या कुटुंबाशी नातेसंबंध सोडण्याची संधी आणि एक मुलगा गमावला आहे. मला या पलीकडे काही बोलायचे नाही, असे सिया गोयल हिच्या वडिलांनी सांगितले.

आणखी वाचा

Ketan Agrawal Case : दारूचं व्यसन, अनेक बॉयफ्रेंड,सिया बारावी फेल, पण चेतनच्या साथीने रचला चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा थरारक कट, चौकशीत खळबळजनक खुलासा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *