EPFO Update: आजपासून EPFO चा एकही क्लेम ३ दिवस पास नाही होणार, काय आहे कारण? | बिझनेस


Last Updated:

EPFO : जर तुम्ही येत्या तीन दिवसांत पीएफ खात्यातून अ‍ॅडव्हान्स पैसे काढण्याचा किंवा पीएफ ट्रान्सफर करण्याचा विचार करत असाल, तर तुमचे काम रखडू शकते.

EPFO
EPFO

महिना अखेर आलाय पगार होण्याआधीच तुमच्या पगारातला काही अंश पगार हा EPFO साठी कापून घेतला जातो. मात्र याचा मेसेजही तुम्हाला अजून आला नसेल तर त्यामागे काही खास कारण आहे. दरमहा पगारातून EPFO कपात होणाऱ्या लाखो नोकरदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आहे.

जर तुम्ही येत्या तीन दिवसांत पीएफ खात्यातून अ‍ॅडव्हान्स पैसे काढण्याचा किंवा पीएफ ट्रान्सफर करण्याचा विचार करत असाल, तर तुमचे काम रखडू शकते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं आपले ऑनलाइन क्लेम प्रोसेसिंग पोर्टल पुढील ३ दिवसांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

EPFO ने थेट सांगितली तारीख

एका मोठ्या तांत्रिक बदलामुळे सिस्टम मायग्रेशन हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे पीएफ खात्याशी संबंधित सर्व ऑनलाइन सेवा काही काळासाठी पूर्णपणे ठप्प होणार आहेत. EPFO ने आपल्या अधिकृत पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, २६ जून २०२६ रोजी रात्री १२:०० वाजेपासून ते २८ जून २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत क्लेम जमा करणे आणि त्याची पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही.

याचा अर्थ असा की, या तीन दिवसांत तुम्ही कोणताही नवीन क्लेम करू शकणार नाही आणि आधी केलेल्या क्लेमवरही काम होणार नाही. या सर्व सेवा २९ जून २०२६ रोजी रात्री १२:०० वाजेपासून पुन्हा नेहमीसारख्या सुरू होतील.

पोर्टल बंद ठेवण्यामागचं खरं कारण काय?

हा कोणताही अचानक आलेला तांत्रिक बिघाड नाही, तर पीएफ धारकांच्या सुविधेसाठी सरकारने घेतलेला हा एक नियोजित निर्णय आहे. पीएफ धारकांना ऑनलाइन सेवा वापरताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि क्लेम सेटलमेंटची गती वाढवण्यासाठी ‘डेटाबेस कन्सोलिडेशन’ आणि सॉफ्टवेअर अपग्रेडेशनचे काम केले जात आहे. या बदलामुळे भविष्यात पीएफ खातेधारकांना अधिक सुरक्षित, वेगवान आणि खात्रीशीर सेवा मिळण्यास मदत होणार आहे. याच मोठ्या कामासाठी हे पोर्टल ३ दिवस बंद ठेवण्यात आले आहे.

काही अडचण आल्यास करा संपर्क!

पोर्टल बंद असल्यामुळे ग्राहकांना होणाऱ्या तात्पुरत्या त्रासाबद्दल EPFO ने दिलगिरी व्यक्त केली आहे, तसेच काम सुरू असेपर्यंत खातेधारकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. जर या काळात कोणाला अत्यंत तातडीची माहिती हवी असेल, तर ईपीएफओने आपल्या सदस्यांसाठी 14470 हा अधिकृत कॉल सेंटर हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. या नंबरवर फोन करून तुम्ही तुमची चौकशी करू शकता. त्यामुळे पीएफचं कोणतंही महत्त्वाचं काम असेल, तर आता थेट २९ जून उजाडण्याची वाट पाहावी लागणार आहे.

EPFO चे पैसे थेट UPI आणि ATM ने काढता येणार 

नोकरदारांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी अपडेट समोर आली आहे. आता पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी क्लेम करून अनेक दिवस वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण EPFO चे पैसे आता थेट UPI आणि ATM द्वारे बँक खात्यासारखेच काढता येणार आहेत. केंद्र सरकारच्या या नव्या सुविधेमुळे खातेधारकांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ आणि घरबसल्या पीएफचे पैसे वापरणे शक्य होणार असून, पीएफ कार्यालयाचे उंबरठे झिजवण्यापासून लाखो कर्मचाऱ्यांची मोठी सुटका होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *