Shubh Yog 27 May 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 27 मे 2026 चा दिवस आहे. आजचा वार बुधवार आहे. हा दिवस गणरायाला समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी चंद्राने वृश्चिक राशीत संक्रमण केलं आहे. आजच्या दिवशी सूर्य आणि बुधाच्या युतीने बुधादित्य योग जुळून आला आहे. त्यामुळे ग्रहांच्या या शुभ योगाचा लाभ कोणकोणत्या राशींना होणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या बाराव्या चरणात हे संक्रमण होणार आहे. तर, चंद्राने आठव्या स्थानी संक्रमण केलं आहे त्यामुळे बुधादित्य योग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. आज तुम्ही ठरवलेली काही कामे तुम्हाला पूर्ण करता येऊ शकतात. तसेच, दिवसाच्या शेवटी भगवान शंकराच्या मंत्राचा जप करणं लाभदायी ठरेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तुमच्या करिअरला नवी दिशा मिळेल. तसेच, उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. मित्रांबरोबर चांगले संबंध निर्माण होतील. कामाच्या निमित्ताने प्रवास होईल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी आजचा दिवस शुभ दिवसांपैकी एक असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. आज दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळू शकते. तसेच, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. नवीन कार्य हाती घेण्यास तुम्ही सक्षम असाल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असेल. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी कोणताच दबाब जाणवणार नाही. तसेच, तुम्हाला तुमची रखडलेली कामेही पूर्ण करता येतील. संध्याकाळच्या वेळी धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, हातात घेतलेल्या कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. अनेक नवीन ऑर्डर्स तुम्हाला मिळतील. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Shani Gochar 2026 : शनिचं बॅक टू बॅक संक्रमण! 2026 वर्षाच्या शेवटी तब्बल 4 वेळा चालीत होणार बदल, ‘या’ 4 राशींवर होणार पैशांची छप्परफाड कमाई
आणखी वाचा