Shubh Yog 23 May 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 23 मे 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार शनिवार आहे. हा दिवस शनिदेवाला (Shani Dev) समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी चंद्राने मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केला आहे. या दिवशी अनेक शुभ योग निर्माण झाले आहे. जसे की, ध्रुव आणि रवि योग. ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशींच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. तसेच, मनाप्रमाणे काम करता येईल.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांना आजच्या शुभ योगाचा चांगला लाभ मिळणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ झालेली दिसेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना देखील प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला फिरण्याची संधी मिळू शकते. अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळतील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. या काळात तुमच्या धनसंपत्तीत चांगली भरभराट पाहायला मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, रखडलेली कामेही तुम्हाला पूर्ण करता येतील.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी आज निर्माण होणारा योग फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्यासाठी अनेक चांगल्या संधी चालून येतील. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, नवीन कार्य हाती घेण्यास तुम्ही सक्षम असाल. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी मोलाचा ठरेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. या काळात तुमच्यातील नेटवर्किंग फार स्ट्रॉंग असणार आहे. करिअरमध्ये अनेक नवीन संधी निर्माण होतील. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. अनेक नवीन गोष्टी तुम्हाला शिकता येतील. तसेच, मित्रांच्या मदतीने तुमची अनेक कार्य सहज पूर्ण होतील. अनेक रखडलेली कामेही मार्गी लागतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी मेचा शेवटचा आठवडा कसा असणार? 6 पैकी 4 राशींना लागणार लॉटरी; साप्ताहिक राशीभविष्य
आणखी वाचा