Shruti Hasan on periods: ‘मला असं वाटतं पुरुषांनाही मासिक पाळी…’; श्रुती हासन नेमकं काय म्हणाली? ‘मी हजार वेळा प्रार्थना केली की…


Shruti Hasan on Periods: अभिनेत्री श्रुती हसन (Shruti Hasan) आपल्या बेधडक आणि स्पष्टवक्तव्यासाठी ओळखली जाते. अभिनेत्री सोशल मीडियात (Social Media) सक्रिय असते. अलीकडेच तिने सोहा अली खानच्या (Soha Ali Khan) पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. तिने पॉडकास्टमध्ये विविध खुलासे केले. तिने या पॉडकास्टमध्ये चित्रीकरणादरम्यान होणाऱ्या मासिक पाळी वेदनेबाबत मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे. तिने या पॉडकास्टमध्ये खुलासा केला की, जेव्हा एका को – स्टारने आपल्या गुडघ्यांच्या सर्जरीबद्दल सांगितलं, तेव्हा फिल्मच्या कृने त्यांच्याहिशोबाने  काम केलं. तिने हजार वेळा प्रार्थना देखील केले की, पुरुषांनाही मासिक पाळी (Periods) यावी. जेणेकरून याचा समावेश कॉन्ट्रॅक्टमध्ये करता येईल.

मासिक पाळीबाबत श्रुती हसन नेमकं काय म्हणाली? (Shruti Hasan Said She Prayed Men Should Get Periods)

 

श्रुती आणि सोहाने या पॉडकास्टमध्ये हार्मोन्स आणि मासिक पाळीबद्दलच्या गैरसमजांवर चर्चा केली. पॉडकास्टमध्ये श्रुती म्हणाले की, ‘ माझ्या मते, यावर एकच उपाय आहे. मी हजारवेळा प्रार्थना केली आहे की, पुरुषांनाही मासिक पाळी यावी, मग आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये पिरियड हॉलिडेचा समावेश करण्यात येईल ‘, असं श्रुती म्हणाली. श्रुतीने यावेळेस सांगितलं की, PCOS मुळे तिला खूप वेदनेचा त्रास सहन करावा लागतो. करिअरच्या सुरुवातीला ती सेटवर याविषयी कुणाशीही चर्चा करू शकली नाही.

बरेच लोक ही गोष्ट बोलण्यास नाकारता. दिग्दर्शकांना असे वाटायचं की, कदाचित तिची एनर्जी लेव्हल कमी झाली असावी, असं श्रुती हसन म्हणाली. श्रुती शेवटी 2025 साली, लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘ कुली ‘ या सिनेमात झळकली होती. रजनीकांत यांची या सिनेमात मुख्य भूमिका होती. याव्यतिरिक्त या सिनेमात इतर कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. आमिर खानने देखील या सिनेमात लहान भूमिका साकारली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

सलमान खानने हेअर ट्रान्सप्लांट केलं की टक्कल? अभिनेत्याने स्वतः सांगितलं खरं कारण; म्हणाला, ‘हा लूक…





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *