Lucky Zodiac Signs On 21 September 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, उद्या 21 सप्टेंबरचा (September 2026) दिवस आहे. हा दिवस भगवान शंकराला समर्पित आहे. तसेच, लवकरच बुध आणि शुक्र ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे शुभ योग निर्माण होणार आहे. ग्रहांच्या संक्रमणाचा देखील अनेक राशींवर परिणाम होणार आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी कोणकोणत्या राशींवर महादेवाची कृपा असणार आहे ते जाणून घेऊयात. तसेच, उद्याचा दिवस कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) भाग्यशाली असणार आहे ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
21 सप्टेंबरचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या सकारात्मक ठरू शकतो. बुधाच्या नक्षत्र बदलामुळे कामातील बारकावे समजून घेण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. नोकरीत नवीन जबाबदारी किंवा महत्त्वाची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन संपर्कातून फायदा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले आर्थिक काम मार्गी लागण्याचे संकेत आहेत.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या जातकांसाठी हा दिवस करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते आणि नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी मिळू शकते. आर्थिक बाबतीत एखादा फायदा किंवा उत्पन्नाचा नवीन मार्ग समोर येऊ शकतो. सरकारी किंवा कागदोपत्री कामे पूर्ण करण्यासाठी दिवस अनुकूल ठरू शकतो. विद्यार्थ्यांनाही अभ्यासात चांगली एकाग्रता मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 21 सप्टेंबरचा दिवस आर्थिक प्रगतीचे संकेत देणारा दिवस ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त लाभ, इन्क्रिमेंट किंवा नवीन संधीबाबत सकारात्मक बातमी मिळू शकते. व्यवसायात नवीन ग्राहक किंवा कामाची ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. एखादा रखडलेला आर्थिक व्यवहार पूर्ण होऊ शकतो. मात्र मोठी गुंतवणूक करताना कागदपत्रे आणि अटी व्यवस्थित तपासणे योग्य ठरेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी चंद्रबल अनुकूल असल्याने दिवस उत्साहवर्धक राहू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पना आणि संवादकौशल्याचा फायदा होईल. महत्त्वाची चर्चा, मीटिंग किंवा व्यवहार तुमच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत एखादी चांगली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधात संवाद वाढल्यामुळे गैरसमज दूर होण्यास मदत होईल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी 21 सप्टेंबरचा दिवस संबंध आणि कामाच्या बाबतीत सकारात्मक ठरू शकतो. चंद्रबल अनुकूल असल्याने निर्णय घेताना आत्मविश्वास वाढू शकतो. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल आणि महत्त्वाचे काम वेळेत पूर्ण करण्याची संधी मिळेल. व्यवसायात नवीन संपर्क फायदेशीर ठरू शकतो. वैयक्तिक आयुष्यातही वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Lakshmi Narayan Rajyog 2026 : 26 सप्टेंबरला जुळून येणार लक्ष्मी नारायण राजयोग; 4 राशींच्या धनसंपत्तीत होणार भरभराट, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार