Shiv Sena Crisis : ‘या’ कारणामुळे बंडखोर खासदारांचा भडका, बैठकीकडे फिरवली पाठ, मोठी अपडेट समोर – Marathi News | Shiv Sena UBT Crisis: 6 MPs Skip Meeting, Rebellion Looms After Raut’s Remarks


महाराष्ट्रातील राजकारणात सध्या प्रचंड खळबळ माजली असून शिवसेना ठाकरे गट पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्याच्या चर्चा असून गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र आणि राजाधानीत मोठं नाट्य सुरू आहे. त्यानंतर शिवसेनेने व्हिप जारी केला. आज दिल्लीत पक्षाच्या संसदीय दलाची बैठक आयोजित करण्यात आली, त्याला हजर राहण्याचे आदेश सहाही खासदारांना देण्यात आले होते. मात्र 11 वाजता सुरू झालेल्या आणि तासाभरानतंर संपलेल्या या बैठकीला 9 पैकी फक्त 3 खासदार उपस्थित होते, 6 बंडखोर खासदारांपैकी एकही उपस्थित नव्हता. यामुळे हे प्रकरणा आणखीनच चिघळले असून आता या खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे, तसेच त्यांच्यावर कारवाईचीही शक्यता व्यक्त होत आहे.

या कारणामुळे फिरवली बैठकीकडे पाठ 

दरम्यान या खासदारांनी बैठकीकडे का पाठ फिरवली याचं एक मोठं कारणही समोर आलं आहे. काल दिल्लीत ठाकरे गटाची झालेल्या पत्रकार परिषद झाली आणि तीच पत्रकार परिषद पक्षाला भोवल्याची चर्चा सरू आहे. कासंजय राऊत, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, अनिल देसाई हे कालपासून दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. काल काळी पत्रकार परिषेददरम्यान राऊत चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी खासदारांना उद्देशून अपश्बद उच्चारले. त्यामुळे खासदार आणखीनच नाराज झाले. त्यामुळे पक्षाकडून व्हीप बजावण्यात आल्यानंतरही या नाराज खासदारांनी आजच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले , अशी माहिती सूत्रांनी दिली.

हे सहा खासदार अनुपस्थित

आज दिल्लीत झालेल्या बैठकीत फक्त संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे चौघे उपस्थित होते. तर संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय (बंडू) जाधव, ओमराजे निंबाळकर , संजय वाकचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर या ससाही खासदारांनी बैठकीकडे पाठ फिरवली, व्हीप बजावूनही त्यांनी पक्षाचा आदेश धुडकावला आणि कोणीही बैठकीला हजर राहिले नाहीत. त्यामुळे कालची ठाकरे गटाची पत्रकार परिषद भोवली अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेनंतर ठाकरे गटाचे बंडखोर खासदार नाराज झाले. खासदारांबद्दल ज्या प्रकारे काल अपशब्द वापरण्यात आले, त्यामुळे ते  खासदार दुखावले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याचाच परिणाम म्हणून सर्व खासदारांनी आजच्या बैठकीला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता पुढे काय होणार हे अत्यंत महत्वाचे असून राज्याचे, देशाचे लक्ष या घडामोडींकडे लागलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *