Share Market: अमेरिका-इराण तणावाने हादरला शेअर बाजार; 1 मिनिटात गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटींचे नुकसान – Marathi News | Share Market collapsed Stock market shaken by US Iran tensions Investors lose Rs 3.75 lakh crore in 1 minute


शेअर बाजार आपटलाImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क

Share Market Down: अमेरिका आणि इराणमधील ताज्या तणावाचे थेट परिणाम शेअर बाजारावर दिसले. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकामध्ये 0.5% हून अधिक घसरण दिसली. संस्थागत परदेशी गुंतवणूकदारांनी FII विक्री सत्र आरंभले. त्याचा थेट परिणाम दिसला. सकाळी 9.16 वाजेपर्यंत सेन्सेक्स 452 अंकांहून अधिकने घसरून 73,815.12 वर आला. तर निफ्टी 50, 153 अंक घसरून 23,229 अंकावर पोहचला. इंडेक्समध्ये बजाज फायनान्साचा शेअर घसरला. या शेअरमध्ये जवळपास 3 टक्क्यांची घसरण आली. त्यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL), बजाज फिनसर्व, ट्रेंट, NTPC, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट आणि L&T या शेअरने निराश केले. हे शेअर 1-2 टक्क्यांनी घसरले. तर दुसरीकडे, इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा आणि एचसीएल टेक आणि इतर आयटी शेअरमध्ये 1-3 टक्क्यांची वाढ दिसली. बाजार अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी बजावत असल्याने गुंतवणूकदार चिंतेत आहेत.

निफ्टी स्मॉलकॅप 100 आणि निफ्टी मिडकॅप 100 इंडेक्स दोन्हीमध्ये जवळपास 1% टक्क्यांची घसरण झाली आहे. क्षेत्रानुसार विचार करता, निफ्टी ऑटो, निफ्टी रियाल्टी, निफ्टी कंझ्युमर ड्यूरेबल्स आणि इतर निर्देशांकात 1% पेक्षा अधिकने घसरले आहेत. तर निफ्टी IT मध्ये जवळपास 2 टक्क्यांची वाढ दिसली. NSE वर जवळपास 887 शेअर्समध्ये वाढ झाली आहे. तर 1,650 शेअरमध्ये घसरण झाली आहे. 97 शेअर जैसे थे आहेत.

बाजार उघडताच 3.75 लाख कोटी स्वाहा

बाजार उघडताच एका मिनिटात 3.75 लाख कोटी रुपये बुडाले. दक्षिण कोरियाचा बाजार कोस्पीने बाजार भांडवलात भारतालाही मागे टाकले आहे. आता कोस्पी हा सहाव्या क्रमांकावर आला आहे. याचा दुसरा अर्थ जगभरात भारताचा शेअर बाजार आता सातव्या क्रमांकावर ढकलल्या गेला आहे. काही दिवसांपूर्वी भारताचा शेअर बाजार हा जागतिक क्रमवारीत 5 व्या क्रमांकावर होता. काही दिवसांपूर्वीच ही जागा तैवान या देशाने घेतला आहे.

इराण-अमेरिका युद्धाचे सावट

गेल्या काही दिवसांपासून मध्य-पूर्वेत पूर्वीसारखे युद्ध सुरू नसले तरी एकमेकांवर हल्ला करण्याची संधी इराण आणि अमेरिका सोडत नसल्याचे दिसते. इस्त्रायलने तेहरान समर्थित हिजबुल्लाह दहशतवादी समूहाविरोधात मोठी लढाई सुरू केली आहे. शुक्रवारी वॉशिंग्टन येथे इस्त्रायल आणि लेबनॉन या देशात शांतता वार्ता सुरू झाली. पण तरीही मध्य-पूर्वेत तणाव कमी झाला नाही. उलट तो वाढला. त्यामुळे या भागात अजून पुढे काही दिवस संघर्षाला विराम मिळण्याची शक्यता माळवली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. त्याचा मोठा फटका आज गुंतवणूकदारांना बसला आहे. गेल्या तीन महिन्यात शेअर बाजाराने उसळी कमी आणि हापकीच अधिक खाल्ल्याचे दिसून येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *