SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरतीची तयारी सुरु, वर्षभरात 12 हजार नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार, बँकेत सध्या किती कर्मचारी?


State Bank of India Recruitment नवी दिल्ली : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया कडून आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये  12 हजार नव्या कर्मचाऱ्यांच्या भरतीची तयारी सुरु आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन सीएस शेट्टी यांनी म्हटलं की या वर्षी बँकेच्या क्लेरिकल आणि ऑफिसर केडरमध्ये 11 हजार ते 12 हजार जणांची भरती केली जाईल. बँकेच्या आवश्यकतेनुसार अंतिम संख्या नंतर जाहीर केली जाऊ शकते किंवा त्यामध्ये बदल होऊ शकतात. 

सीएस सेट्टी यांनी म्हटलं की या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत 12 हजार जणांची भरती पूर्ण होईल. गेल्या आर्थिक वर्षात स्टेट बँक ऑफ इंडियानं मोठ्या प्रमाणात भरती केली होती. ज्यामध्ये 1500 स्पेशालिस्ट आयटी ऑफिसर्स देखील होते. यावर्षी एवढ्या मोठ्या संख्येनं आयटी ऑफिसर्सची आवश्यकता नाही. 

स्टेट बँक ऑफ इंडिया 2.45 लाखांहून अधिक कर्मचारी

मार्च 2026 पर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांची संख्या 2.45 लाख पेक्षा अधिक होती. बँकेच्या आर्थिक वर्ष 2026 च्या वार्षिक अहवालानुसार 2025-26 स्टेट बँक ऑफ इंडियानं 25633 लोकांची भरती केली होती. यामध्ये 4640 अधिकारी, 19340 असोसिएटस आणि 1653 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या वर्षीच्या भरतीमध्ये प्रामुख्यानं क्लेरिकल आणि ऑफिसर केडरवर भर राहण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अधिक माहिती बँकेनं जारी केलेली नाही.  

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांमध्ये वाढ होणार

कर्मचाऱ्यांच्या भरतीसोबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखांचं जाळं वाढवण्यासाठी काम करणार आहे. बँकेकडून आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये 200 ते 250 नव्या शाखा जोडण्याचं नियोजन केलं जातंय. सीएस शेट्टी यांनी स्टेट बँकेचं नेटवर्क मोठं आहे. काही भागांमध्ये बँकेच्या शाखा वाढवण्याची संधी आहे.  

NSE मधील भागीदारी SBI विकणार

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन यांच्याकडून नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आयपीओबाबत माहिती देण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एसबीआय कॅपिटल मार्केटस लिमिटेड मिळून नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील 1 टक्के भागीदारी विकणार आहे. स्टेट बँकेकडून एनएसईमधील 0.65 टक्के आणि एसबीआय कॅपिटल मार्केटस लिमिटेड 0.35 टक्के भागीदारी विकण्यात येणार आहे. 

सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडे एनएसईमध्ये 3.33 टक्के आणि एसबीआय कॅपिटल मार्केटसकडे 4.33 टक्के भागीदारी आहे. एनएसईच्या 30 हजार कोटींच्या आयपीओला सेबीनं मंजुरी दिली आहे. हा आयपीओ आतापर्यंतचा भारतातील सर्वात मोठा आयपीओ ठरु शकतो.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *