Sanjay Raut: पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत? राऊतांनी एका वाक्यात विषय संपवला… अशी दिली तिखट प्रतिक्रिया – Marathi News | Sanjay Raut big reaction on Delimitation Bill Is Sharad Pawar NCP joining the NDA Raut settled the matter in a single sentence here is his sharp reaction said it is a rumours


Sanjay Raut reaction on NCP-NDA: 18 जुलै रोजी, शनिवारी नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा आंदोलन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत हे नागपूरमध्ये आहेत. तर दुसरीकडे शरद पवार यांची राष्ट्रवादी राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत घरोबा करणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. तर महिला आरक्षण विधेयकासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पावसाळी अधिवेशनात सरकार पुन्हा आणणार आणि त्याला राष्ट्रवादी, उद्धव सेना पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांनी कहर उठवला आहे. या सर्व घडामोडींवर खासदार संजय राऊतांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

त्या सर्व अफवा आहेत

या देशासमोर नीट , टीईटी घोटाळा हा सर्वात मोठा गंभीर प्रश्न आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज सतरावा दिवस आहे. त्यांची प्रकृती कमालीची ढासळली आहे. हा आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत गंभीर विषय असायला पाहिजे आणि आपण मला असं सांगताय की आम्ही डिलिमिटेशन आणि महिला बिलाला पाठिंबा देणार आहोत. शरद पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाठिंबा देणार आहे, हे पूर्णपणे चुकीचे आहे. या सर्व अफवा आहेत. आज बारा वाजता सुप्रिया सुळे पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती देतील.

काल राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले होते. त्याचवेळी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही तिथे असल्याचे म्हटले जात आहे. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. जयंतराव पाटील भेटण्यामागचं कारण जे आहे हे त्यांच्या मतदारसंघातला एका नगराध्यक्षाला अत्यंत बेकायदेशीरपणे डिस्कालिफाय करण्यात आले. लोकातून निवडून आलेला नगराध्यक्ष आहे. त्याच्या इस्लामपूर भागाचा आणि कलेक्टरने तिकडल्या अत्यंत बेकायदेशीर नियमबाह्य पद्धतीने त्याला बरखास्त केलं आणि अत्यंत गंभीर गोष्ट लोकशाहीसाठी माझ्या माहितीप्रमाणे ते त्याच विषयावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले आणि त्या विषयावर त्यांनी तक्रार केलेली आहे. शरद पवार पक्षांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते आणि महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते आहेत. तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये मला अजिबात तथ्य वाटत नाही, असे राऊत म्हणाले.

या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी असतील मग काँग्रेस पक्षातल्या काही नेत्यांशी संबंधीत चर्चा असतील. भारतीय जनता पक्षाचा आणि खास शिंदे गटाला दुसरं काय काम राहिलेले नाही. आणि मग अशा प्रकारचा अफवा पसरवून मूळ प्रश्नावरचा विषयावरच लक्ष लोकांचे विचलित करायचं आहे. इथं येण्यापूर्वी माझं सुप्रियाताई सुळे यांच्यासोबत याविषयावर सविस्तर चर्चा झाली आहे. अजून महिला आरक्षण बिल अथवा मतदारसंघ पुनर्रचना बिल हे पावसाळी अधिवेशनात समोर येणार की नाही याचीच माहिती नाही. असं काही असेल तर INDIA आघाडीतील आम्ही सर्व घटक पक्ष काँग्रेस, आमचा पक्ष, डीएमके, राष्ट्रवादी आणि पक्ष यांची अगोदर बैठक होईल. हा दिल्लीचा विषय आहे. दिल्लीत याविषयीची चर्चा आम्ही बैठक घेऊन करू, असे संजय राऊत म्हणाले.

चोरीचा माल घेऊन गृहमंत्र्यांकडे

यावेळी खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. काल चोरीचा माल घेऊन, 6 फुटीर खासदार यांना घेऊन शिंदे शाह यांना भेटले. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू आहेत. पोलीस यंत्रणा चोरीचा माल असेल की लगेच अटक करतात. पण शिंदे मुंबईतून चोरीचे गाठोडे घेऊन दिल्लीत गेले. तरी काहीच कारवाई होत नाही उलट सांगितले जात की माझ्या या मालाला सोन्याचा मुलामा द्या, असा जबरी टोलाही राऊतांनी हाणला.

आम्ही रस्त्यावर मंडप टाकू

18 जुलै रोजी उद्धव ठाकरे हे नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन करणार आहे. पण त्यादिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान बुक करण्यात आले आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. सभास्थळी मंडप टाकण्यात आला आहे. त्यांचा वाढदिवस राममंदिरापेक्षा मोठा आहे. आम्ही रस्त्यावर टाकु मंडप टाकू असा इशारा राऊतांनी दिला. थोड्या वेळात निर्णय होणार आहे. रामाला त्यांनी रस्त्यावर आणले आहे. सिता माईंचे मंगळसूत्र  चोरले, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *