FIFA च्या इतिहासातील सर्वाधिक प्राईज मनी, वर्ल्ड कप जिंकणाऱ्याची छप्परफाड कमाई, सेमी फायनल हरणाराही मालमाल! | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

फिफा वर्ल्ड कप 2026 जिंकणाऱ्या टीमला फक्त ट्रॉफीच नाही तर कोट्यवधी रुपयांची रक्कम मिळणार आहे. एवढंच नाही तर सेमी फायनलमध्ये पराभूत होणारी टीमही मालामाल होणार आहे.

FIFA च्या इतिहासातील सर्वाधिक प्राईज मनी, वर्ल्ड कप जिंकणाऱ्याची छप्परफाड कमाई, सेमी फायनल हरणाराही मालमाल!
FIFA च्या इतिहासातील सर्वाधिक प्राईज मनी, वर्ल्ड कप जिंकणाऱ्याची छप्परफाड कमाई, सेमी फायनल हरणाराही मालमाल!

मुंबई : फिफा वर्ल्ड कप 2026 जिंकणाऱ्या टीमला फक्त ट्रॉफीच नाही तर कोट्यवधी रुपयांची रक्कम मिळणार आहे. एवढंच नाही तर सेमी फायनलमध्ये पराभूत होणारी टीमही मालामाल होणार आहे. वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमसोबतच चौथ्या क्रमांकावर राहणाऱ्या टीमवरही पैशांचा पाऊस पडणार आहे.

फिफाने 2026 वर्ल्ड कपसाठी आतापर्यंतच्या सर्वाधिक प्राईज मनीची घोषणा केली आहे, त्यामुळे स्पर्धेच्या इतिहासातील हा सर्वाधिक रक्कम मिळणारा वर्ल्ड कप ठरणार आहे. 48 टीमच्या या स्पर्धेत पुरस्काराच्या रकमेत मोठी वाढ झाली आहे.

विजेत्या-उपविजेत्यांना किती पैसे मिळणार?

फिफा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमला 50 मिलीयन डॉलर म्हणजेच जवळपास 417 ते 420 कोटी रुपये मिळणार आहेत.

उपविजेत्या टीमला 33 मिलीयन डॉलर म्हणजेच जवळपास 275-277 कोटी रुपये

तिसऱ्या क्रमांकाच्या टीमला 29 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 242-243 कोटी

चौथ्या क्रमांकाच्या टीमला 27 मिलियन म्हणजेच 225-226 कोटी रुपये मिळतील.

फिफाने का वाढवली प्राईज मनी?

फिफाला स्पर्धेच्या ब्रॉडकास्टिंगमधून चांगली कमाई झाली आहे, याशिवाय कमर्शियल पार्टनरशीप आणि स्पॉन्सरशीप डीलही झाल्या आहेत, त्यामुळे फिफाच्या प्राईज फंडमध्ये मोठी वाढ झाली आहे. फिफाचा उद्देश स्पर्धेत भाग घेणाऱ्या नॅशनल असोसिएशनना जास्तीत जास्त आर्थिक पाठिंबा देणं आहे.

कतारमध्ये झालेल्या 2022 चा फिफा वर्ल्ड कपचा प्राईज पूल 440 मिलियन युएस डॉलर होता. तर नव्या टुर्नामेंटमध्ये 1 बिलियन युएस डॉलर देऊन ही रक्कम दुप्पट करण्यात आली आहे.

फायनलला कोण जाणार?

फिफा वर्ल्ड कप 2026 ची दुसरी सेमी फायनल बुधवारी भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 12.30 वाजता होईल. ही सेमी फायनल 1966 ची चॅम्पियन इंग्लंड आणि गतविजेत्या अर्जेंटिनामध्ये होईल. या हायव्होल्टेज सामन्यात विजय मिळवणारी टीम फायनलमध्ये पोहोचेल. त्याआधी झालेल्या पहिल्या सेमी फायनलमध्ये स्पेनने फ्रान्सवर विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

भारतामध्ये कुठे पाहता येणार सामना?

भारतीय फुटबॉल चाहत्यांना दुसऱ्या सेमी फायनलचा थरार टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाईव्ह पाहता येणार आहे. सेमी फायनलचं लाईव्ह प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्सवर फ्री पाहता येईल. याशिवाय भारतात मॅचचं लाईव्ह टेलिकास्ट Unite8 स्पोर्ट्सवरही पाहता येईल. मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग ZEE5 वर पाहायला मिळेल.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/

FIFA च्या इतिहासातील सर्वाधिक प्राईज मनी, वर्ल्ड कप जिंकणाऱ्याची छप्परफाड कमाई, सेमी फायनल हरणाराही मालमाल!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *