Samantha Ruth Prabhu pregnant: साऊथ सुपरस्टार समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या आपल्या पर्सनल आयुष्यामुळे (Entertainment) चर्चेत आहे. अभिनेत्री सोशल मीडियात (Social Media) प्रचंड सक्रीय असते. शनिवारी सोशल मीडियावर अभिनेत्रीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओवरुन अभिनेत्रीच्या पर्सनल आयुष्याशी निगडीत अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. व्हिडीओमधील समंथाच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांनी समंथा गरोदर असल्याचा दावा करण्यास सुरुवात केली आहे. व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये समंथा प्रेग्नेंट आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
समंथा रुथ प्रभू खरंच प्रेग्नेंट आहे का? (Samantha Ruth Prabhu pregnancy Viral video)
समंथाचा ‘मां इंति बंगाराम’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगलाच रिस्पॉन्स मिळत आहे. या सिनेमाच्या सक्सेस पार्टीसाठी संपूर्ण टीम एकत्र आली होत. समंथा आणि राजने मिळून सिनेमाला मिळालेल्या प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद पाहून आनंद व्यक्त केला. व्हायरल व्हिडीओमध्ये समंथा अगदी साध्या लूकमध्ये दिसत होती. तिनं व्हाईट टी – शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली होती. दरम्यान, व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांचं लक्ष तिच्या बेबी बंपकडे गेलं.
समंथाचा बेबी बंप पाहून अभिनेत्री गरोदर असल्याची चर्चा रंगू लागली. तिचा व्हिडीओत बेबी बंप स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान, समंथा किंवा राज निदिमोरु या दोघांनीही सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांवर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. एचटीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे आपल्या आयुष्यातील नवीन सुरुवातीबद्दल खूप आनंदी आहे. लवकरच हे कपल याची घोषणा करतील.
समंथा सिंपल लूक तर, राजने ब्लॅक जीन्सवर ब्राऊन शर्ट घातला होता. दोघेही साध्या कॅज्यूल लूकवर होते. दरम्यान, व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच अभिनंदन केलं आहे. एका युझरने कमेंट सेक्शनमध्ये, ‘अभिनेत्री प्रेग्नेंट आहे. अभिनंदन सॅम’ अशी कमेंट केली आहे. अभिनेत्रीचा बेबी बंप पाहून समंथा प्रेग्नेंट असल्याचा दावा करण्यात येत आहे.
अभिनेत्री समंथा आणि राज या दोघांनी मिळून 1 डिसेंबर 2025 रोजी कोईम्बतूरमध्ये एका खासगी समारंभात लग्न केले होते. अभिनेत्रीने तिच्या लग्नातील फोटो सोशल मीडियात शेअर केले होते. या कपलची पहिली भेट ‘द फॅमिली मॅन 2’च्या सेटवर झाली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष