Salman Khan : 59 हजारांची चप्पल, 24 हजारांची जीन्स आणि… सलमानच्या या साध्या लूकसाठी लाखो खर्च, किंमत ऐकूनच.. – Marathi News | Decoding Salman Khan’s Rs 34 Lakh Viral Ambani Ganesh Outfit : Brands and Cost


Salman Khan Look : दबंग स्टार सलमान खान (Salman Khan ) जेव्हा एखाद्या लूकमध्ये दिसतो, तेव्हा अवघ्या काही क्षणात त्याचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होतो. नुकताच तो अंबानी कुटुंबियांच्या फॅमिलीच्या गणेशोत्सवात सहभागी झाला. तिथे तो अगदी सिंपल लूकमध्ये दिसला. निळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स त्याने घातली होती. तर डोक्यावर त्याने बंडाना बांधला होता.चाहत्यांना त्याचा हा लूक एवढा आवडला की पाहता पाहता सोशल मीडियावर त्याचा लूक, फोटोज आणि व्हिडीओजद्वारे लागलीच व्हायरल झाला. पण सलमानचा हा लूक दिसायला सिंपला असला तरीही , त्याच्या शर्टापासून ते चपलेपर्यंत प्रत्येक गोष्टीवर प्रचंड पैसे खर्च झाला आहे. त्याच्या या संपूर्ण लूकची किंत आहे तब्बल 34 लाख रुपये.. वाचून आश्चर्याचा धक्का बसला ना, पण हे खरं आहे. चला जाणून घेऊया ,सविस्तर

‘Filmdom.in’ या सेलिब्रिटींच्या घडामोडींची माहिती देणाऱ्या इन्स्टाग्राम हँडलवर सलमान खानच्या या संपूर्ण लूकची किंमत उघड करण्यात आली आहे. चला तर मग, त्याच्या जीन्सपासून ते घड्याळापर्यंतच्या प्रत्येक वस्तूची किंमत जाणून घेऊया. सलमानने घातलेला शर्ट ‘राल्फ लॉरेन’ (Ralph Lauren) या ब्रँडचा असल्याचं समजतं. या लिनन शर्टची किंमत 12,500 रुपये आहे. तर, त्याने घातलेली जीन्स ‘डिझेल’ (Diesel) या ब्रँडची असून तिची किंमत 24 हजार रुपये आहे.

34 लाखांचं घड्याळ

सलमान खानने घातलेल्या चपला अगदी साध्या वाटत असल्या तरी त्या ‘व्हॅलेंटिनो गारावानी’ (Valentino Garavani) या ब्रँडच्या आहेत आणि त्यांची किंमत थोडीथोडकी नव्हे तर 59 हजार रुपये आहे. तर त्याने डोक्यावर बांधलेला बंडाना 1500 रुपयांचा आहे. एवढंच नव्हे तर त्याच्या गळ्यात 45 हजारांची आहे. सलमानच्या हातात नेहमी दिसणारं आयकॉनिक ब्रेसलेट, तब्बल 65 हजारांचं आहे. या लूक मधील सर्वात महागडी वस्तू म्हणजे सलमानने घातलेलं घड्याळ; त्याची किंमत 32 लाख रुपये असल्याचं सांगितलं जातं. हे घड्याळ ‘ऑडेमर्स पिगुएट’ (Audemars Piguet) या ब्रँडचे आहे. एकूणच, सलमानचा हा लूक तयार करण्यासाठी 34.07 लाख रुपये खर्च झालेत.

सलमानचे आगामी चित्रपट

सध्या, सलमानचे चाहते त्याच्या ‘मातृभूमी’ (Matrubhumi) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे, मात्र प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. याव्यतिरिक्त, तो पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या एका ॲक्शन-ड्रामा चित्रपटातही दिसणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचे शीर्षक अद्याप जाहीर केलं नसलं तरी, त्याचं नाव ‘मॉन्स्टर’ (Monster) असू शकते अशी चर्चा आहे. या चित्रपटात सलमानसोबत नयनतारा झळकणार असून, वामसी पेडिपल्ली याचे दिग्दर्शन करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *