Saiie manjhrekar and Gauri ingavale on Medha Manjhrekar: मराठी विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh manjhrekar) यांची पत्नी मेधा मांजरेकर (medha manjhrekar) यांचा कर्करोग निदान झाले आहे. याबाबतची अधिकृत माहिती मेधा मांजरेकर यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन दिली आहे. महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर ही जोडी आतापर्यंत अनेक सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. पण आता मेधा मांजरेकर यांना झालेला कर्करोग आणि भावनिक पोस्टमुळे चर्चेत आहे. त्यांनी आपल्या पोस्टमधून कर्करोगावरील (Cancer) उपचारांचा एक महत्त्वाचा टप्पा पार केला असल्याचं व्हिडीओतून सांगितलं. याची माहिती त्यांनी आपल्या चाहत्यांना पोस्टद्वारे दिली. दरम्यान, त्यांची पोस्ट व्हायरल होताच (Saiie Manjhrekar), मेधा मांजरेकर यांच्या चाहत्यांनीही त्यांच्या प्रकृतीत (Gauri Ingavale) सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना केली आहे.
मेधा मांजरेकरांसाठी लेकींची भावुक पोस्ट (Sai Manjrekar and gauri emotional post for mother medha)
दरम्यान, अशातच मेधा मांजरेकर यांच्या लेकी, सई आणि गौरी या दोघांनीही आईसाठी खास पोस्ट लिहीली आहे. ‘तू खूप जास्त खंबीर आहेस…आई मला तुझा खूप अभिमान आहे’, असं म्हणत तिनं आपल्या आई मेधा मांजरेकर यांनाही पोस्टमध्ये टॅग केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेधा मांजरेकर यांना कर्करोग झाला असून, त्यांच्यावर किमोथेरपी सुरू आहे. यात एका पोस्टमध्ये त्यांचे पूर्णपणे केस कापलेले दिसत आहे. कर्करोगच्या उपचारांचा पहिला टप्पा पूर्ण होत असल्यामुळे त्यांनी ही पोस्ट शेअर करुन याची माहिती दिली. अनेकांनी त्यांच्या पोस्टवर कमेंट करुन त्यांना पाठिंबा दिला आहे.
मेधा आणि महेश यांची मुलगी सई मांजरेकर हिनं देखील आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन आईसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. एका पोस्टमध्ये सईने, मेधा यांचा कॅन्सरनंतर उपचार घेतल्यानंतरचा फोटो शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये, ‘Strongest Ever…आई मला तुझा खूप खूप अभिमान आहे’,असं तिनं आपल्या पोस्टला कॅप्शन दिलं आहे. तर, दुसऱ्या एका पोस्टमध्ये सईने आई मेधाचा पोस्ट शेअर करत, ‘हॅपी बर्थ डे बेस्टी.. वाढिवसाच्या खूप शुभेच्छा आई..आमच्या आयुष्यात प्रकाश टाकण्याबद्दल तुझे खूप आभार आई.. मी तुझ्यावर खूप प्रेम करते’, असं तिनं म्हटलं.
तर, गौरी इंगवले हिने देखील आपल्या आईसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. तिनं आईसोबतचा फोटो शेअर करत, ‘हॅपी बर्थ डे आई’ असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. सध्या सई मांजरेकर आणि गौरी इंगवले या दोघींचेही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दोघींनीही आपल्या आई प्रति प्रेम, आदर व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव