Sachin Pilgaonkar Kapuskonda Teaser: मराठी मनोरंजनसृष्टीची अनेक दशकं गाजवणारे अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या एका सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. ‘नवरा माझा नवसाचा 2’ ‘ या सिनेमानंतर पुन्हा एकदा सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर ‘कापूस कोंडा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. साधारण 20 वर्षांपूर्वी मधुराणी आणि सचिन यांनी एकत्र काम केलं होतं. इतक्या वर्षांनी आता पुन्हा एकदा ते एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. दरम्यान, कापूस कोंडा या चित्रपटाचा टिझरने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. या टीझरमधील सचिन पिळगावकर यांचा एकाच डायलॉगमुळे प्रेक्षकांचे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रक्षाबंधनच्या निमित्ताने या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला होता. या धमाल टीझरची सध्या एकच चर्चा आहे.
‘कापूसकोंडा’ चित्रपटाचा टिझर
माणूस आणि प्राणी यांच्यातील भावभावना आणि नातेसंबंधांचे मनोरंजक पद्धतीने उलगडलेला ‘कापूस कोंडा’या चित्रपटाची झलक नुकतीच प्रेक्षकांना दाखवण्यात आली. या चित्रपटाचा धमाल टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढलीय. या टिझरमध्ये मागून आवाज येतो . ‘कापूस कोंड्याची गोष्ट ऐकली का हो ? आता ऐकू नका बघाच..’ आणि अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर झोपेतून खडबडून जागी झालेली दिसते. तिच्या बाजूला झोपलेल्या मुलीही उठतात. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव असतात. स्वयंपाक घरात एका खुर्चीत ‘हँड्सअप’ अवस्थेत बसलेले सचिन पिळगावकर यांच्या मांडीवर एक कुत्रा असतो. आणि शेवटी सचिन पिळगावकर यांचा एकच डायलॉग प्रेक्षकांचे लक्ष वेधतो. या एका डायलॉगमुळे सगळ्यांचीच उत्सुकताच ताणली आहे.
कापूसकोंडा या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांचं आहे. संवादलेखन आणि पटकथा सचिन मोहिते, गणेश पंडित, ऋषिकेश तुरई यांनी केली आहे. छायांकन सचिन पाटेकरांचं आहे. चित्रपटाच्या गाण्यांना अवधूत गुप्ते, पद्मनाभ गायकवाड यांचा आवाज आहे. सुहास राणे यांनी ध्वनी तंत्रज्ञ म्हणून काम पाहिले असून पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत व्हीपी माऊली ग्रुप ऑफ कंपनीज यांच्यासह सॉरी वाला फिल्म हा चित्रपट सादर करीत आहेत. या चित्रपटाची निर्मिती जास्वंद एंटरटेनमेंट प्रा. लि.ने केलिये .
कधी होणार चित्रपट रिलीज?
अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री मधुराया आणि गोखले यांच्यासह नवीन पिढीतील अक्षता पाडगावकर,जानवी तांबट आणि अभिनेता भूषण पाटील अशी स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.या चित्रपटाचे सूट लातूर जिल्ह्यातील अंधारी या गावात करण्यात आलय. सचिन पिळगावकर आणि मधुराणी प्रभुलकर यांनी २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. हा चित्रपट 23 ऑक्टोबर प्रदर्शित होणार आहे.