Rohit Pawar : गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश, रोहित पवारांच अन्नत्याग आंदोलन तात्पूरतं स्थगित,नेमकी काय चर्चा झाली? | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे मागच्या तीन दिवसांपासून सूरू असलेले अन्नत्याग आंदोलन आज अखेर त्यांनी तात्पुरतं मागे घेतलं आहे.

News18
News18

Rohit Pawar Protest : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे मागच्या तीन दिवसांपासून सूरू असलेले अन्नत्याग आंदोलन आज अखेर त्यांनी तात्पुरतं मागे घेतलं आहे. भाजपचे मंत्री आणि संकटमोचक गिरीष महाजन यांनी रविवारी उशूीराा रात्री आंदोलन स्थळी रोहित पवारांची भेट घेतली. या बैठकीत जवळपास अर्धातास त्यांच्यात चर्चा झाली. या चर्चेनंतर रोहित पवारांनी आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं. दरम्यान आंदोलन स्थळी झालेल्या बैठकीत गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांच्यात काय चर्चा झाली? हे जाणून घेऊयात.

आपली बैठक ठरली आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये ही आमची भूमिका असल्याचे रोहित पवार म्हणाले. यावेळी रोहित पवार यांनी गिरीश महाजन यांचे अभिनंदन केले. कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले आहे. मी ज्या मतदारसंघात काम करतो तिथेच अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला आहे. सरकारनं काढलेला जीआर महत्वाचा आहे. सरकारचे अभिनंदन करतो. फक्त या जीआरमध्ये अनेक अटी आहेत. यामुळं अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. 2019 ची कर्जमाफी झाली. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला त्यांना आताच्या या योजनेमध्ये लाभ मिळणार नाही. ही अट काढा असे रोहित पवार म्हणाले. सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी आहे. रविकांत तुपकर बुलढाण्यात ते आंदोलन करत आहेत. त्यांना देखील भेटा असे रोहित पवार म्हणाले. रेग्युलर शेतकऱ्यांना 50 हजारांचे लिमिट आहे ते वाढवले पाहिजे असे रोहित पवार म्हणाले आहेत.शेतकऱ्यांच्या वतीने 4 जुलैला मोठे आंदोलन घेणार आहोत असे रोहित पवार म्हणाले.

गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांच्या भेटीवेळी म्हणाले की, ‘राज्य सरकार सकारात्मक आहे. मोदी असतील किंवा फडणवीस असतील सर्व सकारात्मक आहे. वारंवार शेतकऱ्यांना कर्जमाफी का द्यावी लागते. तर शेतकरी अडचणीत असतो. त्यामुळे त्यांना कर्जमाफी देत असतो. शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्नही आपण सोडवत आहोत. रोहित पवार यांच्या मागण्यांबाबत बैठक बोलावली आहे. चर्चेतून तोडगा निघेल. मी रोहित पवार यांना विनंती करतो की त्यांनी आंदोलन मागे घ्यावं.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

Rohit Pawar : गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश, रोहित पवारांच अन्नत्याग आंदोलन तात्पूरतं स्थगित,नेमकी काय चर्चा झाली?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *