Radha Patil: नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू


पुणे : यंदाच्या दहीहंडी (Dahihandi) उत्सवात सिनेतारकांपेक्षा लावण्यवतींचा जलवा पाहायला मिळाला. मुंबईत गौतमी पाटीलच्या अदांनी नवी मुंबईकर घायाळ झाले होते. तर, बिग बॉस फेम आणि रिल स्टार राधा पाटीलनेही पुण्यात मनोरंजन कार्यक्रम गाजवला. मात्र, आता पुण्यातील (Pune) कार्यक्रमाचे व्हिडिओ व्हायरल झाले असून नृत्यामध्ये अश्लील हावभाव राधा पाटीलने केल्याची टीका होत आहे. त्यातच, या मनोरंजन कार्यक्रमाच्या अनुषंगाने राधा पाटीलसह (Radha Patil) आयोजकांवर गुन्हा दाखल झाला आहे.  

दहीहंडी कार्यक्रमात कार्यक्रम सादर करताना अश्लिल नृत्य सादर होऊ नये, यासाठी सहभागी होणाऱ्या कलाकारांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली होती. या आदेशानुसार प्रमाणपत्र सादर न केल्याने मंडळाला कार्यक्रमाची परवानगी नाकारली होती. मात्र, परवानगी नाकारली असताना देखील कार्यक्रम करणाऱ्या प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा पाटील यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष, आयोजकावर पुण्यातील बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील बिबडेवाडी येथे नृत्यांगणा राधा पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दहीहंडी उत्सावासाठी राधा पाटीलला बोलवण्यात आले होते. यावेळी, राधाच्या अदांनी पुणेकर चाहते घायाळ झाले, राधाचे नृत्यही इंस्टावरुन व्हायरल झाले असून या नृत्यात अश्लील हावभाव केल्याचा आरोपही काही जणांकडून होत असून सोशल मीडियावर तशा कमेंटही पाहायला मिळत आहेत. त्यातच, आता कार्यक्रमाच्या नृत्य सादरीकरणासाठी आवश्यक प्रमाणपत्र न घेतल्याने राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

लावणी नृत्यांगणा राधा पाटील (रा. मुंबई), एम्पायर ग्रुप ए.के. बॉइजचे अध्यक्ष भुषण अभिमान सोनवणे (रा. अंबामाता मंदिराजवळ, सुखसागरनगर, भाग 1, कात्रज) आणि आयोजक अमोल काटे (रा. कात्रज) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. मंडळाचे अध्यक्ष, आयोजक तसेच प्रत्यक्ष कार्यक्रम सादर करणाऱ्या लावणी नृत्यांगणा राधा पाटील यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्राधिकृत कागदपत्रे किंवा प्रमाणपत्र सादर न केल्याने बिबवेवाडी पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. याप्रकरणी, बिबवेवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *