Pune : सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना कोर्टाचा दणका, थेट दुहेरी जन्मठेपेची शिक्षा – Marathi News | Pune pimpri chinchwad group assault case four accused get double life imprisonment


राज्यासह देशभरातील अनेक ठिकाणी खून मारामारीच्या घटने घडत आहेत. तसेच काही ठिकाणी बलात्काराच्याही घटना समोर आलेल्या आहेत. पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात 4 वर्षांपूर्वी एका तरूणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. या प्रकरणात गेल्या चार वर्षांपासून कोर्टात सुनावणी सुरू होती. अशातच आता शिवाजीनगर सत्र न्यायालयाने या प्रकरणातील 4 आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सामूहिक बलात्काराने पुणे हादरलं

पिंपरी चिंचवडमध्ये चार वर्षांपूर्वी एका तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नराधमांना अखेर न्यायालयाने जबरदस्त चपराक दिली आहे. 2021 मध्ये तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिचा अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेलिंग करून नंतर वारंवार सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणाने पुणे हादरलं होतं. ही घटना समोर येताच देहूरोड पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली होती.

पुराव्यांच्या आधारे आरोपींवर आरोप सिद्ध

अटकेनंतर आरोपींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी भक्कम पुरावे गोळा करत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलं होतं. शिवाजीनगर सत्र न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील पाटील यांनी प्रभावी बाजू मांडली होती. वैद्यकीय पुरावे, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी यांच्या आधारे न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवलं होतं.

4 आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

या सामूहिक बलात्कार प्रकरणातील नोमान उर्फ अरबाज जावेद खान, सुलतान उर्फ मुश्ताख सलीम सय्यद, रियाज उर्फ मन्नन जावेद खान आणि सोहेल शेअरली पिरझादे या चारही आरोपींना न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. महिलांवर अत्याचार करून धमक्यांच्या जोरावर त्यांचं आयुष्य नरक बनवणाऱ्यांसाठी हा निकाल म्हणजे थेट इशाराच आहे. कायद्याचा फास उशिरा का होईना पण अशा नराधमांच्या गळ्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आता अनेकांनी या निकालाचे स्वागत केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *