Last Updated:
एका भरधाव मारूती कारने टू व्हिलरला धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर कारचालक फरार झाला होता. आय टी पार्क हिंजवडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
Pimpari Chinchwad : पुण्यातील पिंपरी चिंचवड भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका भरधाव मारूती कारने टू व्हिलरला धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर कारचालक फरार झाला होता. आय टी पार्क हिंजवडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. तसेच या हिट ॲन्ड रनचा थरार कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
खरं तर आयटी पार्क हिंजवडी परिसरात आज सकाळी हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मारुंजी लिंक रोड ते विप्रो सर्कल दरम्यान घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार आणि व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एका टु व्हिलर वाल्याचा पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कार चालकासोबत रस्त्यावर जात असताना अचानक वाद झाला.हा वाद इतका झाला की टु व्हिलर चालकाने त्याचा पाठलाग करून वाद घालायला सूरूवात केली.
पुणे: आयटी पार्क हिंजवडी परिसरात हिट अँड रनची धक्कादायक घटना pic.twitter.com/Z7DpJZGE8E
— VIRALबाबा (@viralmedia70) July 2, 2026
विशेष म्हणजे पाठलाग करत असताना टु व्हिलर चालकाने कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीला हाताने मारहाण करण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर विप्रो सर्कलजवळ कारने टु व्हिलरला जोरदार धडक दिली. ज्यामुळे टु व्हिलरचा चालक थेट एका उभ्या असलेल्या कारवर आदळला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.या घटनेनंतर कारचालक घटनास्थळावरून कॅपजेमिनीच्या दिशेने भरधाव वेगाने गाडी पळवत पसार झाला होता.
दरम्यान या घटनेत चुक कुणाची हे समजू शकलेले नाही आहे.कारण दुचाकीस्वार मुद्दामुन कारचालकाच्या जवळ जाऊन मारहाणीचा प्रयत्न करत आहे.या घटनेत दोन्ही बाजूंची चूक असल्याचे समोर येत असून, घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Pune,Maharashtra
Jul 02, 2026 11:45 PM IST
Pune : चुक कुणाची? मारुतीच्या कारने दुचाकीस्वाराला चाकाखाली चिरडलं, पुण्यात हिट अँड रनचा VIDEO
