Horoscope Today 24 September 2026: आज गुरूवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, पैसा, नोकरी, प्रेम जीवन.. आजचे राशीभविष्य..


Horoscope Today 24 September 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 24 सप्टेंबर 2026, आजचा दिवस अत्यंत खास आहे, सध्या गणेशोत्सवाचे दिवस सुरू आहेत. आज गुरूवारचा दिवस असल्याने हा दिवस भगवान दत्तगुरूंना समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या… 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस तुम्ही मांडलेली मते दुसऱ्याच्या गळी उतरवाल, मनात नसताना प्रवासाला जावे लागेल 
 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस नोकरीमध्ये जिथे पाहिजे तेथे प्रवास करायला मिळणार नाही, त्यामुळे थोडी चिडचिड होईल, महिला सर्वांना समजून घेतील 
 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस तब्येत चांगली ठेवली तर इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला जमेल, त्यामुळे आरोग्य पहिले सांभाळा 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस विद्यार्थ्यांना बौद्धिक बाजू शैक्षणिक क्षेत्रात चांगली सांभाळता येईल, एखाद्या स्पर्धेमध्ये चांगले यशही मिळू शकते 
 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस तुमच्या हजरजबाबीपणामुळे लोकांवर प्रभाव पाडाल, परंतु उठसूट दुसऱ्यावर टीका करण्याचे टाळा 
 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस तुम्ही तुमच्या मताशी ठाम राहाल, त्यामुळे कोणत्याही कामासाठी इतरांचा होणारा विरोध म्हणून  पाडाल
 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस राजकारणी लोक आपल्या मुत्सद्दीपणा दाखवतील, महिला थोड्या अशांत राहतील 
 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस खूप व्यवहारी आणि हिशेबी वृत्तीने वागाल, याच्या फायद्या बरोबर तोटेही तुम्हाला सहन करावे लागतील 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस संततीच्या वागण्या बोलण्याचा त्रास होईल, नवीन जागेसंबंधी केलेले व्यवहार यशस्वी होणार नाहीत 
 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायात सकारात्मक दृष्टिकोन जास्त उपयोगी पडेल, वैवाहिक जीवनात पेल्यातील वादळ निर्माण होतील 
 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस सामंजस्याचे धोरण आज स्वीकारा, काही अनपेक्षित खर्चांना तोंड द्यावे लागेल 
 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, आर्थिक तंगीला सामोरे जावे लागेल.

हेही वाचा :

Ganesh Chaturthi 2026: ‘घालीन लोटांगण’ म्हणताना स्वतःभोवती प्रदक्षिणा मारणे योग्य की अयोग्य? प्रार्थनेचा खरा अर्थ जाणून थक्क व्हाल, धार्मिक महत्त्व…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *