Narendra Modi: CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,’युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही…’


NEET Paper Leak:  कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मार्चनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नीट पेपर लीकवर (NEET Paper Leak) पहिल्यांदाच वक्तव्य समोर आले आहे. पीएम मोदींनी एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत सांगितले की, युवकांच्या भविष्याशी खेळ करू देणार नाही. पेपर लीकच्या दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. पीएम मोदी म्हणाले, पेपर लीक हा राजकारणाचा विषय नाही. त्यांच्या भविष्याचे नुकसान होऊ नये, म्हणूनच री-एग्झाम (पुनर्परीक्षा) घेण्यात आली आणि ती यशस्वीपणे पूर्ण केली. ते म्हणाले की पेपर लीक प्रकरणात सरकारकडून तत्काळ (NEET Paper Leak) कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यांबाबत सरकार संवेदनशील आहे.(NEET Paper Leak)

Narendra Modi : पुढे असे घडू नये, याची व्यवस्था करू

पीएम म्हणाले की हा फक्त केंद्र सरकारचा विषय नाही. पेपर लीकच्या दोषींना शिक्षा देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे लागेल. ते म्हणाले की पुढे असे घडू नये, यासाठी व्यवस्था करू.(NEET Paper Leak)

Narendra Modi :  CJP च्या संसद मार्चनंतर पीएम मोदींचे वक्तव्य

पीएम मोदींचे हे वक्तव्य कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मार्चनंतर आले आहे, ज्यामध्ये विरोधी पक्षांचे अनेक खासदारही सहभागी झाले होते. या मार्चदरम्यान हिंसाचाराच्या घटनाही समोर आल्या, ज्यानंतर दिल्ली पोलीस आणि RAF ने त्यांच्यावर लाठीचार्ज केला होता. जेव्हा आंदोलनकर्ते संसदेजवळ पोहोचले तेव्हा तिथे अश्रुरोधक वायूचे नळकांडे सोडण्यात आले आणि त्यांना तिथून हुसकावून लावले गेले.(NEET Paper Leak)

Narendra Modi :  CJP ने जे. पी. नड्डा यांच्याकडे सोपवल्या मागण्या

कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने CJP चे सौरव दास आणि आशुतोष राकां यांनी आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. सूत्रांच्या माहितनुसार, दोघांमध्ये दोन फेऱ्यांची चर्चा झाली, परंतु सरकारकडून आंदोलनकर्त्यांच्या कोणत्याही मागणीवर कोणतेही आश्वासन देण्यात आले नाही. नड्डा यांनी त्यांना धरणे आंदोलन संपवून सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

चर्चेदरम्यान जे. पी. नड्डा यांनी विचारले की त्यांच्या मागण्या काय आहेत. यावर प्रतिनिधींनी आपल्या मागण्यांची यादी सांगितली. नड्डा यांनी त्यांना सांगितले की जर त्यांना त्यांच्या मागण्यांवर सरकारकडून विचार व्हावा असे वाटत असेल तर त्यांनी लिखित स्वरूपात सादर करावे. यानंतर CJP च्या प्रतिनिधींनी संध्याकाळी सुमारे ४ वाजता केंद्रीय मंत्र्यांकडे आपल्या मागण्यांचे लिखित पत्र सोपवले.

Narendra Modi : नीट परीक्षेबाबत नेमकं काय काय म्हणाले मोदी?

नीट परीक्षेबाबत बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, जेव्हा पेपर लीकची बातमी समोर आली, तेव्हा सरकारने तत्काळ कारवाई करत १३ जणांना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी नीट (NEET) पुनर्परीक्षेला प्राधान्य देण्यात आले आणि ही पुनर्परीक्षा यशस्वीपणे पार पाडून तिचा निकाल जाहीर करण्यात कोणताही विलंब केला गेला नाही. भविष्यात पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी अत्यंत कडक पावले उचलण्यात आली आहेत. पेपर लीकच्या धंद्यात जे लोक लिप्त आहेत आणि दोषी आढळल्यामुळे ज्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी सर्वोच्च दर्जाच्या वकिलांनीही सहकार्य करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे; जेणेकरून पेपर लीकसारखे पापकृत्य करणाऱ्यांना कडक शासन मिळेल. पुढे असा पेपर लीक रोखण्यासाठी उचललेल्या ठोस पावलांची माहिती देताना पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, हा केवळ एका राज्याचा किंवा फक्त केंद्र सरकारचा विषय नाही, तर संपूर्ण देशाचा विषय आहे. देशातील ज्या ज्या राज्यात पेपर लीक प्रकरणात लोक लिप्त आहेत, ज्यांनी हे घाणेरडे पापकृत्य केले आहे, त्यांना शिक्षा देण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. हा कोणत्याही पक्षीय राजकारणाचा विषय नसून देशाचा आणि तरुणांच्या भविष्याचा विषय आहे. त्यामुळे युवकांच्या भविष्याशी कोणीही खेळ करू नये यासाठी कडक पावले उचलून दोषींना शिक्षा दिली पाहिजे आणि एक दोषरहित (Foolproof) परीक्षा यंत्रणा तयार करण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्र काम केले पाहिजे, असे पंतप्रधानांनी सांगितले असल्याची माहिती आज (मंगळवारी) पार पडलेल्या एनडीए (NDA) संसदीय पक्षाच्या ‘मंगल मिलन’ बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

हेदेखील वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *