Mumbai Crime News : मुंबईतून (Mumbai) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पवई पोलीस ठाण्याच्या (Powai Police Thane) हद्दीत एकाची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रस्त्यावरत झोपणाऱ्या एका भिकाऱ्याची (beggar) हत्या झाल्याची घटना घडली आहे. रिक्षावाला समजून भिकाऱ्याची हत्या केल्याची प्रकार समोर आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
एका रिक्षावाल्यासोबत दोन मद्यपीं केलेल्या व्यक्तीचं काही दिवसांपूर्वी भांडण झालं होतं. या भांडणात रिक्षा चालकाने एकाच्या कानशिलात लगावली होती. त्याच भांडणाचा राग त्या मद्यपान केलेल्या दोघांनी आपल्या मनात ठेवला होता. आठवड्याभरानंतर रिक्षा चालकाची हत्या करायची या भावनेतून तो धारदार शस्त्र घेऊन रिक्षा स्टॅन्ड वर गेला. तिथे बाहेर झोपलेल्या एका व्यक्तीवर त्याने धारदार शस्त्राने वार केले. पुढे तपासात समोर आलं की मृत पावलेली व्यक्ती रिक्षावाला नसून रस्त्यावर झोपणारा भिकारी होता. या धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे. आरोपीला मुळात ज्या व्यक्तीला मारायचं होतं त्याला न मारता त्याने भलत्याच व्यक्तीला मारल्याची धक्कादायक घटना पवई पोलिसांच्या हद्दीत घडली आहे.
मुंबई गुन्हे शाखा युनिट दहाच्या टीमकडून आरोपीला गुजरातमधून अटक
दरम्यान, पवईतील हत्येचा अवघ्या काही तासांतच पर्दाफाश करण्यात यश आलं आहे. गुजरातमधून मुख्य आरोपीला मुंबई गुन्हे शाखा युनिट 10 ने अटक केली आहे. रिक्षाचालकाशी झालेल्या वादातून हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. चुकीच्या व्यक्तीला रिक्षाचालक समजून हत्या केली आहे. आरोपी आणि रिक्षा चालक यांच्यासोबत काही दिवसापूर्वी वाद झाला होता. यावेळी रिक्षा चालकांनी आरोपीला कानाखाली मारली होता. याच कारणातून त्याचा काटा काढण्यासाठी आरोपीने एक आठवड्यानंतर रिक्षा चालकाला मारायला गेले होते. मात्र यावेळी रिक्षामध्ये रस्त्यावर भीक मागणारा व्यक्ती झोपला असताना आरोपीला वाटले की तो रिक्षा चालक आहे आणि त्याची हत्या केली. मृत व्यक्तीची ओळख मोहम्मद युसुफ अशी पटली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीपर्यंत पोलिस पोहोचले आहेत. आरोपी दीपक उर्फ दिपू वर्मा बिहारचा रहिवासी आहे. हत्या करुन आरोपी गुजरातला पळाला होता. मुंबई गुन्हे शाखा युनिट दहाची टीम कडून जलद कारवाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
सुपारी देऊन भावानेच काढला सख्ख्या भावाचा काटा, भिवंडी हत्या प्रकरणाचा छडा, चार आरोपींना अटक
आणखी वाचा