Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!


पुणे : राज्यात दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला होता. याचं प्रकरणात आणखी दहा जणांना मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. त्यामुळं आता अटकेचा आकडा 24 वर पोहचलाय. आजच्या कारवाईत ही राजकीय पक्षांशी संबंधित व्यक्ती असल्याची चर्चा सुरु आहे. 

राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये 4 जुलै रोजी एकाचवेळी छापा टाकून या टोळीचा पर्दाफाश करण्यात एफडीए आणि पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलं होतं. या कारवाईत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांशी निगडित व्यक्तींना अटक करण्यात आल्याची अन माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांचे निकटवर्तीय असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र वळसे पाटलांनी माझा या दूध भेसळीशी संबंध नसल्याचा दावा केला होता. 

आता आधीच्या आरोपींकडून ज्या व्यक्तींना भेसळीचं साहित्य देण्यात आलं, त्या दहा जणांना आज बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. वास न येणारा शाम्पू, दुधाची पावडर, केमिकलसह इतर भेसळयुक्त पदार्थ वापरुन हा दूध भेसळीचा धंदा सुरु होता. या दहा आरोपींना आज न्यायालयात हजर केलं असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत

1) संतोष बबन मोरे, वय-43 वर्षे, रा. शिरापुर, सिध्देश्वर मंदिरा जवळ, ता. पारनेर, जि. आहिल्यानगर.
2) दत्तात्रय रामदास भागवत, वय-41 वर्षे, रा. खडकवाडी, वडदरा, ता. आंबेगांव, जि. पुणे.
3) गणेश सुदाम पडवळ, वय-40 वर्षे, रा. सविंदने, ढगेवस्ती, ता. शिरूर, जि. पुणे.
4) आनंदा मारुती पवार, वय-56 वर्षे, रा. टाकळकर वाडी, जि.प.शाळेजवळ, ता. खेड, जि. पुणे.
5 ) कुलदिप प्रकाश पवळे, वय-30 वर्षे, रा. गुरुदेव साम्राज्य, चव्हाण मळा, एच-१, फ्लॅट नं. १०४, ता. खेड, जि. पुणे.
6) रविराज बबन थोरात, वय-32 वर्षे, रा. चांडोली बुद्रुक, जि. प. शाळे जवळ, ता. आंबेगांव, जि. पुणे.
7) राजेंद्र भगवान सिनलकर, वय-45वर्षे, रा.लोणी, ता. आंबेगांव, जि. पुणे.
8) ओंकार पोपट गिरवले, वय-28 वर्षे, रा. देवुळगांव सिध्दी, गुंडेगांव रोड, गिरवलेवस्ती, ता. नगर, जि.आहिल्यानगर.
9) आशिष विठ्ठल लोंढे, वय-30 वर्षे, रा. लोंढेमळा, एकलहरे, ता. आंबेगांव, जि. पुणे.
10) सतिष महादु वाबळे, वय-47वर्षे, रा. चांडोलीखुर्द, काटेमळा, ता. आंबेगांव, जि.पुणे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *