Shocking : ना सुट्टी, ना वीक ऑफ…ऑफिसमधील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून महिलेचा टोकाचा निर्णय – Marathi News | Karnataka mysore women ends life over workplace harassment latest marathi news


कर्नाटकच्या म्हैसूरमधून धक्कादायक घटना घडली आहे. म्हैसूरच्या हिंकलमध्ये शुक्रवारी एका 45 वर्षीय महिलने राहत्या घरात आत्महत्या केली आहे. नागेश्वरी असे महिलेचे नाव आहे. पती अशोक यांनी वारंवार नागेश्वरीला फोन केला, परंतु त्यांचा फोन नागेश्वरीने उचलला नाही. त्यानंतर तातडीने घरी पोहोचले. त्यावेळी घरात एका बाजूला नागेश्वरी आढळून आली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.

नागेश्वरीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घरी धाव घेतली. त्यावेळी घरात तपासादरम्यान तिने आत्महत्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळली. यात तिने काम करत असलेल्या ऑफिसवर गंभीर आरोप केले आहेत. ती एका सुपरमार्केटमध्ये काम करत होती. ती या कंपनीत गेल्या अनेक वर्षांपासून काम करत होती. परंतु तिला अनेक त्रासाला सामोरे जावे लागत होते. तिने या चिठ्ठीत डॉली नावाच्या सुपरवायझरवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. तिने आठवड्याची सुट्टी आणि चुका न करताही छळले जात आहे, असा आरोप चिठ्ठीत केला आहे.

नागेश्वरीने चिठ्टीतून बेकायदेशीररित्या कामावरून काढून टाकल्याचाही आरोप केला आहे. आजारी असताना दोन-तीन दिवस कामावर न आल्याने कामावरून काढून टाकल्याचा आरोप केला आहे. या वागणुकीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे तिने चिठ्ठीत म्हटलं आहे. सध्या पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे. आता पोलीस आरोपी आणि इतर संबंधित माहितीचा तपास घेत आहे. या घटनेने नागेश्वरीचे पती अशोक यांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर अशोक यांनी संबंधित सुपरमार्केट आणि आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. नागेश्वरीच्या आत्महत्येने राहत असलेल्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टीप : (तुम्ही मानसिक तणावात असाल, तर तुम्ही भारत सरकारच्या जीवनसाथी हेल्पलाइन 18002333330 वर संपर्क साधू शकता. त्याचबरोबर टेलिमानस हेल्पलाइन 1800914416 यावरही कॉल करू शकता. या क्रमांकावर कॉल करणाऱ्यांची माहिती गुपित ठेवली जाते. तुम्हाला या हेल्पलाइनवर योग्य मार्गदर्शन मिळेल.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *