Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी


नवी दिल्ली : मुंबईचा युवा खेळाडू सरफराज खान (Sarfaraz Khan) याच्यासाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली आहेत. बीसीसीआयनं (BCCI) साई सुदर्शनच्या (Sai Sudharsan) जागी सरफराज खान याला संधी दिली आहे. 28 वर्षीय सरफराज खान यानं शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर 2024 मध्ये खेळला होता. जवळपास पावणे दोन वर्ष संघातून बाहेर राहिल्यानंतर सरफराज खान याला पुन्हा संधी मिळाली आहे. सरफराज खाननं आतापर्यंत भारतासाठी 6 कसोटी सामने खेळले आहेत. 

भारतीय क्रिकेट टीम सध्या कोलंबोमध्ये आहे. भारतानं सराव सामन्यात श्रीलंका एकदाशला पराभूत केलं आहे. आता टीम इंडियाचे खेळाडून गॉलमध्ये जातील. गॉल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये 15 ऑगस्टला पहिली कसोटी भारत आणि श्रीलंका यांच्यात होईल. बीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार सरफराज खान गॉलकडे निघण्यापूर्वी टीममध्ये दाखल होईल.  

साई सुदर्शनच्या दुखापतीबाबत अपडेट

बीसीसीआयनं साई सुदर्शनच्या दुखापतीसंदर्भात माहिती दिली आहे. साई सुदर्शन सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) मध्ये आहे. साई सदुर्शनच्या उजव्या पायाच्या अंगठ्यामधील दुखापतीत सुधारणा झाली आहे. तो दुखापतीतून वेगानं बरा होत आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमकडून साई सुदर्शनवर लक्ष ठेवलं जातंय.

सरफराज खानचं कमबॅक 

सरफराज खान यानं 2024 मध्ये भारतीय संघात पदार्पण केलं होतं. त्यानं भारतीय टीमकडून 6 कसोटी सामने खेळले. यापैकी 11 डावात त्यानं  371 धावा केल्या. सरफराज खानच्या नावावर एक शतक आणि 3 अर्धशतक केली आहेत. नोव्हेंबर 2024 मध्ये सरफराज खान यानं न्यूझीलंड विरोधात शेवटची कसोटी खेळली होती, त्यानंतर तो संघाबाहेर होता, आता संघात त्याची निवड झाली आहे. मात्र, प्लेईंग इलेव्हनमध्ये सरफराज खानला संधी मिळते का याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.  

भारताचा अपडेटेड संघ:

शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, आकिब नबी, सरफराज खान.

हेदेखील वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *