5 Marathi Movies Box Office Collection: सिनेविश्वात एक असा काळ होता, जेव्हा बॉलिवूडने एकपेक्षा एक दमदार सिनेमे केले आणि बॉक्स ऑफिसवर राज्य केलं. बॉलिवूडच्या अनेक सिनेमांनी फक्त चाहत्यांच्या मनावरच नाही तर, बॉक्सऑफिसवर देखील कमाल केली. पण त्यानंतर दिवस बदलले आणि साऊथच्या सिनेमांनी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आणि बॉलिवूड मागे राहिला आणि साऊथ सिनेविश्वाने जगावर राज्य केलं. सिनेमाचा बजेट कमी असून देखील सिनेमांनी उत्तम कमाई केली. याच कारणामुळे छोट्या कलाकारांना देखील लोकप्रियता मिळाली. तेलुगू, तमिळ, मल्याळम किंवा कन्नड यांपैकी कोणताही सिनेमा असो, गेल्या काही वर्षांत त्या सर्वांनीच बॉक्स ऑफिस कमाईच्या बाबतीत ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केले आहेत. आता या लिस्टमध्ये मराठी सिनेमाची चर्चा होऊ लागली आहे आणि ही अत्यंत आदंनाची गोष्ट आहे… सिनेमाची कथा चांगली असेल तर, प्रेक्षक आपोआप सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचतो… हे सिद्ध झालं आहे…
2026 हे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक क्रांतिकारी वर्ष मानलं जाऊ शकतं. कारण यंदाच्या वर्षी असे दोन सिनेमे प्रदर्शित झाले, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली. यामध्ये सर्वात पहिला क्रमांक अभिनेता रितेश देशमुख स्टारर ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा आहे. सिनेमाने 130 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. सिनेमाचा बजेट पाहता, कमाई फार मोठी नाही. पण मराठी सिनेविश्वात 100 कोटींचा टप्पा पार करणारा ‘राजा शिवाजी’ सिनेमा पहिला सिनेमा ठरला आहे. तर या सिनेमाने अन्य मराठी सिनेमासाठी रस्ते मोकळे केले आहेत.
2026 मध्ये दोन मराठी सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवली. एकीकडे रितेश देशमुख स्टारर ‘राजा शिवाजी’ सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा चित्रपटगृहातील प्रवास आता संपला आहे. सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे, बजेट कमी असून देखील ‘देऊळ बंद 2’ सिनेमाने कमी दिवसांमध्ये उत्तम कमाई केली आहे. सिनेमा चित्रपटगृहातील प्रवास अद्यापही सुरु आहे, पण तो अंतिम टप्प्यावर आहे, असं म्हणायला हरकत नाही.
‘देऊळ बंद 2’ सिनेमाचं बजेट फक्त 10 कोटी रुपयांचं होतं… असं सांगितलं जातं. पण सिनेमाने फार कमी दिवसांमध्ये जवळपास 82 – 87 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. आता येत्या काही दिवसांत सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘देऊळ बंद 2’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.
‘या’ 5 मराठी सिनेमांनी रचला मोठा इतिहास
टॉप 5 मराठी सिनेमांमध्ये क्रिकेटचे देव सचिन तेंदुलकर यांचा देखील सिनेमा आहे. टॉप 5 मराठी सिनेमांच्या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर ‘सचिन- अ बिलियन ड्रीम्स’ सिनेमाने आहे. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाने 76-77 कोटी रुपयांची कमाई केली. चौथ्या क्रमांकावर 2026 मध्ये प्रदर्शित झालेला ‘देऊळ बंद 2’ सिनेमा आहे. सिनेमाने 87 कोटींची कमाई केली असून, अद्यापही सिनेमाचा चित्रपटगृहातील प्रवास सुरुच आहे…
तिसऱ्या क्रमांकावर 2023 मध्ये प्रदर्शित झालेला ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा आहे; या सिनेमाने 92 कोटी रुपयांची कमाई केली आणि त्याला प्रचंड पसंती मिळाली. दुसऱ्या स्थानावर 2016 मधील ‘सैराट’ हा सिनेमा आहे, जो प्रचंड यशस्वी आणि अत्यंत लोकप्रिय ठरला होता. दरम्यान, रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाने 130 कोटी रुपयांच्या कमाईसह अव्वल स्थान पटकावलं आहे. आता राजा शिवाजी सिनेमाचा रेकॉर्ड कोणता मराठी सिनेमा मोडेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.