Last Updated:
रवी जयस्वाल, प्रतिनिधी जालना: मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी अंतरवाली सराटीमधून आमरण उपोषणाची घोषणा केली. मराठा आरक्षणासाठी त्यांनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उगारलं आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू राहण्याचा पण जरांगे पाटील यांनी केला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा सरकारला थेट अल्टिमेटम दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सातारा गॅजेट, हैदराबाद गॅजेटच्या नोंदींचा आधार घेऊन मराठ्यांना आरक्षणासाठी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी ठाम ठेवली आहे.
First Published :
May 29, 2026 10:24 AM IST
