Thane :  मुसळधार पावसामुळं ठाण्याच्या मद्रास चाळीतील इमारतीचा काही भाग कोसळला, तीन जण जखमी


Thane : ठाण्यातील आझाद नगर परिसरातील मद्रास चाळीतील पहिला मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. हे 25 ते 30 वर्षाचे जुने बांधकाम होते. या घटनेमुळं तीन जण जखमी झाले आहेत. एक महिला व दोन लहान मुलांचा समावेश आहे. उर्मिला जैस्वाल वय 30 वर्ष, जयकुमार जैस्वाल वय 10  वर्ष, विनीतकुमार जैस्वाल 8 वर्ष अशी जखमींची नावे आहेत. 

स्थानिक नागरिकांनी व आपत्कालीन विभाग अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमींना बाहेर काढून खाजगी रुग्णालयात दाखल केले आहेत. सध्या त्यांचे प्रकृती स्थिर असल्याचा प्रशासनाच्या वतीने सांगितले आहे. सतत पडलेला मुसळधार पावसामुळे ही घटना घडली आहे. अग्निशामक दल, प्रभाग समितीचे अधिकारी आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाली आहे. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *