KKR vs DC IPL 2026 Last Match : आयपीएल २०२६ मध्ये केकेआर आणि दिल्लीमध्ये शेवटचा म्हणजेच ७० वा सामना पार पडलाय या सामन्यामध्ये दिल्लीने विजय मिळवला. कॅप्टन रहाणेने केलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ गेली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आयपीएल २०२६ मधील शेवटचा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पाडला. या सामन्यामध्ये दिल्ली संघाने ४० धावांनी विजय मिळवत आपला शेवट गोड केला. दिल्लीने पहिल्यांदा फलंदाजी करताना २०३-५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना केकेआरचा संघ १६३ वर ऑल आऊट झाला. आजच्या सामन्यामध्ये काहीच रस राहिलेला नव्हता. याचं कारण म्हणजे राजस्थान संघाने मुंबईचा पराभव केला आणि प्ले ऑफ चे शर्यतीत चौथे स्थान पक्के केले. त्यामुळे पंजाब आणि केकेआर हे दोन्ही संघ बाहेर पडले. आयपीएलच्या या शेवटच्या सामन्यात कुलदीप यादव याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.
आजच्या सामन्यामध्ये दिल्लीकडून केल राहुल याने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली. फक्त ३० चेंडू खेळताना दोनशेच्या स्ट्राईक रेटने चार षटकार आणि पाच चौकार मारले. तर अक्षर पटेल यानेही ३९ धावांची महत्त्वाची खेळी केली. त्यासोबतच डेविड मिलर नाही १९ चेंडूत तीन षटकारांसह २८ धावा करत संघाला २०० च्या पार पोचवण्यात मदत केली. केकेआर कडून सौरभ दुबेने सर्वाधिक २ विकेट घेतल्या तर अनुकूल रॉय, सुनील नारायण आणि वरुण चक्रवती यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. MI vs RR : मुंबई इंडियन्सचा 30 धावांनी दारूण पराभव, राजस्थानची प्ले ऑफमध्ये थाटात एन्ट्री; पंजाब-केकेआर बाहेर दरम्यान, केकेआरकडून सलामीला कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि फिन एलन हे उतरले होते. आक्रमक सुरुवातही केली होती परंतु लुंगी एनगिडीने ४३ धावांवर एलनची विकेट घेत केकेआरला पहिला धक्का दिला. त्यानंतर आलेल्या मनीष पांडे आणि अजिंक्य रहाणेसोबत यांनी डाव सावरला होता. MI vs RR: बुमराहला संपूर्ण हंगामात दुखापत होती तरीही खेळवलं म्हणून परफॉर्मन्स खराब झाला? राजस्थानविरुद्ध मॅचपूर्वी कोच जयवर्धनेकडून मोठा खुलासा दोघांनीही २५ चेंडू ४४ धावांची भागीदारी केली होती. मात्र पुन्हा एकदा एनगिडीने पांडेला २५ धावांवर आउट करत दुसरा धक्का दिला. त्यानंतर रोवमन पॉवेलने अजिंक्य सोबत ३२ धावांची भागीदारी केली होती. पण ग्रीन आऊट झाला अन् चौथी विकेट पडली आणि संपूर्ण कोलकाताचा डाव गडगडला. कुलदीप यादव याने एकाच ओव्हरमध्ये अजिंक्य आणि रिंकुला आऊट करत सामना पूर्णपणे झुकवला. या दोन विकेट नंतर आठव्या ओव्हर मध्ये तीन विकेट गेल्या. शेवटी १६३ वर कोलकाताचा संघ ऑल आऊट झाला.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा