34 वर्षांनी विधानभवनात, अचानक शरद पवार एकनाथ शिंदेंच्या दालनात, भेटीमागे ‘राज’कारण काय? बड्या नेत्याने सगळं सांगितलं – Marathi News | Jitendra awhad first reaction on eknath shinde and sharad pawar meet at vidhan bhavan after Sanjay raut allegation latest marathi news


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी 34 वर्षांनी विधानभवनाला भेट दिली. विधानसभवनात एन्ट्री केल्यानंतर ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात गेले. काल विधानभवनात एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची भेट झाली. परंतु दोन्ही नेत्यांची भेट ही ठाकरे गटाला खुपली. या भेटीवर संजय राऊत यांनी निशाणा साधला. परंतु या भेटीमागे कोणतंही राजकारण नाही, म्हणत दोन्ही नेत्यांच्या भेटीवर आमदार जिंतेद्र आव्हाड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार आणि संजय राऊत यांच्या भेटीवर संजय राऊत यांनी निशाणा साधल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. राऊतांनी टीका केल्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात. संजय राऊतांच्या टीकेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. यावर आमदार जिंतेद्र आव्हाड यांनी टीव्ही9 मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊतांचे टीका आणि आरोप फेटाळून लावले.

शरद पवार कॅबिनमध्ये आल्यानंतर एकनात शिंदे हे कॅबिनेट बैठक थांबवून भेटायला आले. एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये जवळपास 15 मिनिटे चर्चा झाली. एकनाथ शिंदेंनी शरद पवारांचं आदरातिथ्य केलं. एकनाथ शिंदे हे काही वेळात बैठकीला निघून गेल्यानंतरही शरद पवार हे शिंदेंच्या दालनात राष्ट्रवादीच्या आमदारांशी चर्चा करत होते. यावरून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपावर आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘ विधानभवनाच्या एका दालनात आमदारांची बैठक घ्यायची होती. जिन्याजवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दालन होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामागे कोणतीही राजकीय किंवा भावनिक मानसिकता नव्हती. त्यांच्या प्रकृती आणि सोय बघून हे करण्यात आलं. हे काही समजवण्यासाठी नाही. परंतु हे समजून घेतलं पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो’.

‘ही बाब संजय राऊत यांना फोन करून सांगू शकत नाही. मी छोटा माणूस आहे. एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठकीमध्ये बसले होते. त्यांना कळलं असेल, त्यानंतर ते भेटीसाठी खाली आले. दालनात आल्यानंतर त्यांनी शाल घातली आणि ते लगेच निघून गेले. यात आपलेपणाची भावना आहे. राजकारणात ते आमचे शत्रू नाही. आमचे वैचारिक मतभेद जरूर आहेत. त्यांनी केलेल्या क्रियेबद्दल जरूर आक्षेप आहेत. परंतु ते आमचे शत्रू होत नाहीत’, असे जिंतेद्र आव्हाड यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *