Jalna Crime: मराठवाड्यातील जालनामधील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल आहे. हा व्हिडिओ एकावर जीवघेणा हल्ला करतानाचा आहे, ही घटना घडल्याने सध्या जालनाकरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जालना, योगेश काकफळे: जालना शहरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काल दिनांक 23 ऑक्टोंबर रोजी रात्री 9:30 वाजता प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र मित्तल यांच्या पुतण्यावर तर तब्बल 5 ते 6 जणांनी प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या हल्ल्याची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात सुद्धा कैद झाली आहे. हे सीसीटीव्ही फूटेज सध्या प्रचंड व्हायरल झाले आहे.
कसा केला हल्ला?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी दुचाकीने पाठलाग करत मित्तल यांच्या पुतण्याची कार अडवली. त्यानंतर त्यांना कारमधून बाहेर काढत बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा एकूण प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडिओत एक महिला स्वतःचा बचाव करण्यासाठी ओरडतानाही दिसत आहे. पोटगीच्या रकमेवरून युजवेंद्र चहलचा धनश्री वर्मावर निशाणा; म्हणाला, ‘आईची शपथ घेऊन सांगा…’ दिवाळी पाडव्याच्याच दिवशी रात्री मित्तल हे गुजरात पासिंगचा नंबर असलेल्या वाहनातून पत्नीसह घरी परतत होते. तेव्हा दुचाकीवरून आलेल्या 5 ते 6 गुंडांनी मिळून गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी यश मित्तल यांना अडवले आणि त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ला केल्यानंतर ते हल्लेखोर तात्काळ घटनास्थळावरून पसार झाले.दरम्यान, या झालेल्या हल्ल्यात यश मित्तल गंभीर जखमी झाले असून त्यांना छत्रपती संभाजीनगरातील एका खासगी रुग्णाल दाखल करण्यात आले आहे. यांच्यावर सध्या आयसीयुमध्ये उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहेत. सदर मारहाणीचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ विरोधकांपर्यंत सुद्धा पोहोचला.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहीत पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यांनी हा व्हिडिओ ट्विट करताना राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. रोहित पवारांनी गृहमंत्र्यानी फक्त बघ्याची भूमिका न घेता तात्काळ राज्यात सर्वसामान्य नागरिकांना भयमुक्त केले पाहिजे, असे ट्विट करत सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
हल्ल्याचा व्हिडिओ
दरम्यान, हा व्हिडिओ पाहून सर्वसामान्य नागरिक व व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस विभाग जालना शहरातील सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांना न्याय देणार का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान, याप्रकरणी आता पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा