IPL 2026: वैभव सूर्यवंशीचं विक्रमी शतक होता होता 3 धावांनी हुकलं, पण नोंदवले इतके सारे रेकॉर्ड – Marathi News | IPL 2026 Eliminator rr vs srh Vaibhav Sooryavanshi missed his century by 3 runs but set so many records


IPL 2026: वैभव सूर्यवंशीचं विक्रमी शतक होता होता 3 धावांनी हुकलं, पण नोंदवले इतके सारे रेकॉर्डImage Credit source: IPL/BCCI

आयपीएल 2026 स्पर्धेतील एलिमिनेटर फेरीत राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडून दिलं. कुठे टप्पा टाकावा हे देखील त्यांना कळेनासं झालं होतं. कारण जिथे चेंडू टाकावा तिथे त्याच्या भात्यातून चौकार षटकार येत होता. त्याने 29 चेंडूत 97 धावा केल्या यावरून काय आक्रमक खेळून गेला याचा अंदाज येतो. वैभव सूर्यवंशीने 334.48 च्या स्ट्राईक रेटने 97 धावांची खेळी केली. यात त्याने 12 षटकार आणि 5 चौकार मारले. पण प्रफुल हिंगेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यामुळे त्याचं विक्रमी शतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. जर त्या चेंडूवर झेल बाद झाला नसता तर 29 चेंडूत शतक त्याच्या नावावर असतं. शतक झालं असतं तर आयपीएल स्पर्धेतील सर्वात वेगवान शतक ठरलं असतं. पण तसं झालं नाही आणि ख्रिस गेलचा कमी चेंडू शतक ठोकण्याचा विक्रम अबाधित राहिला. असं असताना वैभव सूर्यवंशीने काही विक्रम आपल्या नावावर केले.

वैभव सूर्यवंशीने इतके सारे विक्रम नोंदवले

वैभव सूर्यवंशीने 97 धावांच्या खेळीसह या स्पर्धेतील 15 सामन्यात 680 धावांची खेळी केली आहे. तसेच ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आला आहे. इतकंच काय तर आयपीएलच्या एका हंगामात 600 हून अधिका धावा पूर्ण करणारा वैभव सूर्यवंशी हा सर्वात तरुण खेळाडू आहे. यापूर्वी हा विक्रम 2018 मध्ये ऋषभ पंतच्या नावावर होता.

वैभव सूर्यवंशीने आयपीएलच्या एका पर्वात ख्रिस गेलचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी ख्रिस गेलने 2012 मध्ये 59 षटकार मारले होते. आता वैभव सूर्यवंशी त्याच्या खूप पुढे निघून गेला आहे. वैभव सूर्यवंसीने 65 षटकारांची नोंद केली आहे. आयपीएल स्पर्धेत ख्रिस गेलच्या 10हून अधिक षटकार मारणाऱ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. ख्रिस गेलने 10हून अधिक षटकार चार वेळा मारले होते.

आयपीएल स्पर्धेच्या बाद फेरीत वैभव सूर्यवंशीने सर्वात जलद अर्धशतक ठोकत विक्रमाची बरोबरी केली आहे. यापूर्वी 2014 मध्ये सुरेश रैना पंजाब किंग्सविरुद्ध 16 चेंडूत अर्धशत ठोकलं होतं. आता वैभव सूर्यवंशीने 16 चेंडूत अर्धशतकी खेळी केली.

पावरप्लेच्या सहा षटकांच्या आत वैभव सूर्यवंशीचं हे पाचवं अर्धशतक आहे. आता त्याच्या पुढे डेविड वॉर्नर असून त्याने 6 वेळा ही कामगिरी केली आहे. तर 20 पेक्षा कमी षटकात अर्धशतक ठोकण्याची कामगिरी वैभवने पाचव्यांदा केली आहे. त्याने निकोलस पूरनची बरोबरी केली आहे. त्याच्या पुढे आता अभिषेक शर्मा असून त्याने सहावेळा अशी कामगिरी केली आहे.

पावर प्लेच्या सहा षटकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वैभव सूर्यवंशीने मोडला आहे. त्याने सहा षटकात 8 षटकार मारले आहेत. त्याने सनथ जयसूर्या, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, अभिषेक शर्मा आणि स्वत:चा 7 षटकारांचा विक्रम मोडीत काढला आहे.

वैभव सूर्यवंशीने पावरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. डेविड वॉर्नरने 2016 मध्ये 467 धावा केल्या होत्या. आता वैभव सूर्यवंशीने या स्पर्धेत 490 धावा करत नवा विक्रम रचला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *