India vs Afghanistan, 1st ODI: अफगाणिस्तानने दिलेल्या आव्हानाचा सहज पाठलाग करत टीम इंडियाने पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात विजयी सलामी दिली. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 24.5 षटकात सर्वबाद 194 धावा केल्या. भारताने हे आव्हान 22.5 षटकांत पूर्ण केले. गिलने कॅप्टन इनिंग करताना 66 चेंडूत नाबाद 66 धावा केल्या. केएल राहुलने 19 चेंडूत 39 धावा करत विजय आणखी सोपा केला. तत्पूर्वी, डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. दुखापतीतून सावरून संघात परतलेला रोहित शर्मा अवघ्या 16 धावांवर बाद झाला. त्यानंतर इशान किशन आणि गिलने दुसऱ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. इशान 22 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यरही स्वस्तात 12 धावांवर बाद झाला. त्यानंतर राहुल आणि गिल यांनी विजय साकार केला.
दरम्यान, नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या अफगाण संघाची सुरुवात खराब झाली. पॉवरप्लेमध्येच त्यांनी 26 धावांत तीन विकेट गमावल्या. पदार्पण करणाऱ्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने इब्राहिम झद्रानला (1 धाव) बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर अर्शदीप सिंगने सेदिकुल्ला अटल (0 धावा) आणि रहमत शाह (3 धावा) यांना बाद केले. टीम इंडियाकडून पदार्पण केलेल्या हर्ष दुबे आणि गुरनुर ब्रार यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेत चमकदार कामगिरी केली.
अवघ्या 48 चेंडूंमध्ये विक्रमी शतक
त्यानंतर रहमानुल्ला गुरबाजने अफगाणिस्तानचा डाव सावरला. गुरबाजने अवघ्या 25 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. गुरबाजला हशमतुल्ला शाहिदीने चांगली साथ दिली आणि दोघांनी चौथ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली. गुरबाजने आपले शतक पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ घेतला नाही, त्याने अवघ्या 48 चेंडूंमध्ये ते पूर्ण केले. गुरबाजने 51 चेंडूंमध्ये आठ षटकार आणि आठ चौकारांसह 102 धावा केल्या. गुरबाजची विकेट नितीश कुमार रेड्डीने घेतली. त्यानंतर पदार्पण करणाऱ्या हर्ष दुबेने कर्णधार हशमतुल्ला शाहिदीला (27 धावा) बाद करून भारताला पाचवे यश मिळवून दिले. नितीश कुमार रेड्डीने मोहम्मद नबीलाही (9 धावा) बाद केले. त्यानंतर हर्ष दुबेने अझमतुल्ला उमरझाई (26 धावा) आणि अल्लाह गझनफर (0) यांच्या विकेट्स घेतल्या. शेवटच्या षटकात, गुरनूर ब्रारने रशीद खान (9) आणि झियाउर रहमान शरीफी (4) यांना बाद करून अफगाण डाव गुंडाळला.
गुरबाजने 21 वर्षांचा विक्रम मोडला
रहमानुल्ला गुरबाजने 48 चेंडूंमध्ये शतक झळकावले. अफगाणिस्तानने केलेले हे सर्वात जलद एकदिवसीय शतक आहे. यापूर्वी हा विक्रम मोहम्मद शहजाद आणि करीम सादिक यांच्या नावावर होता, ज्यांनी प्रत्येकी 72 चेंडूंमध्ये शतके केली होती. गुरबाजचे शतक हे भारताविरुद्धचे दुसरे सर्वात जलद एकदिवसीय शतक आहे. यापूर्वी केवळ पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने हा विक्रम मोडला आहे, ज्याने 2005 च्या कानपूर एकदिवसीय सामन्यात 45 चेंडूंमध्ये शतक केले होते. विशेष म्हणजे, 21 वर्षांनंतर एका फलंदाजाने भारताविरुद्ध 50 पेक्षा कमी चेंडूंमध्ये एकदिवसीय शतक केले आहे. यापूर्वी शाहिद आफ्रिदीने 2005 मध्ये 45 चेंडूंमध्ये शतक केले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला